उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी एक बेस्ट ऑप्शन “उटी”
summer-holidays-in-ooty
सध्या मुलांच्या शाळेला सुट्टी लागणार असल्याने अनेक घराघरातून एप्रिल किंवा मे महिन्यात व्हेकेशन चे प्लॅन बनत असतात तुम्ही सुद्धा अश्या काही विचारात असाल तर उटी हा तुमच्यासाठी एक मस्त पर्याय आहे .जरी पर्यटक वर्षभर उटीला भेट देत असले तरी, एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे.
बेंगलोरहुन ऊटीला जातानाचा रस्ता बंदिपुर नॅशनल पार्क मधुन आहे, त्याठिकाणी अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे,
बॉटॅनिक गार्डन, रोझ गार्डन, दोडाबेट्टा पीक उटी मधील मस्ट वॉच . बॉटॅनिक गार्डन – ५५ एक्करात असलेलं हे गार्डन खुप अप्रतिम आहे.
रोझ गार्डन – तामिळनाडूच्या हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट ने अत्यंत सुंदर पद्धतीने हे मेंटेन केले आहे.
कोन्नुरला जाण्यासाठी टॉय ट्रेन आहे . त्यामध्ये बसून प्रवासाचा अनुभव अप्रतिम
“दिल से” या चित्रपटातील “छय्या छय्या” हे गाणे याच ट्रेनवर चित्रित झाले आहे..
ऊटी ते मेट्टुपालयम अशी ती ट्रेन निलगीरी पर्वताच्या रेल्वे ट्रॅक वरून धावते.
या स्टिम इंजिन ट्रेनचा ४६ किलोमीटर चा प्रवास आहे. संपुर्ण प्रवासात निलगिरीच्या झाडांचा सुगंध दरवळत रहातो. आजुबाजुला विविध प्रकारची झाडं रंगीबेरंगी फुले लक्ष वेधून घेतात .
ऊटी हे चहाच्या बागांसाठी / शेतीसाठी साठी प्रसिद्ध आहे. चहाचे अनेक फ्लेवर पहायला आणि चविला मिळतात . प्रत्येकाची चव घेत चहा पावडर खरेदी करणे हा चहाप्रेमींसाठी सुखद अनुभव आहे.
एवढं निसर्गरम्य ठिकाण बॉलिवूडच्या नजरेतुन कसे सुटेल?? अनेक चित्रपटांच शुटिंग झालेले स्पॉट याठिकाणी आहेत . चहाची पानं खुडण्याचा (फक्त फोटो साठी) अनुभवही घेता येतो
एकाच ठिकाणी निसर्ग, पर्वत, पाणी, धुकं……….असं सगळं अनुभवायला मिळत ते ऊटीलाच..