Monday, December 23, 2024
संस्कृती

आज संकष्टी चतुर्थी.. वाचा काय आहे मुहूर्त आणि चंद्रोदय.. Sankashti Chaturthi march 2023

Sankashti Chaturthi march 2023: संकष्ट चतुर्थी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Sankashti Chaturthi march 2023: मार्च महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी म्हणजेच 11 मार्च 2023 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करुन उपवास करण्यात येतो. श्री गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी भाविक मनोभावे पूजा करतात. या दिवशी विधिवत गणरायाची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. जाणून घ्या संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदयाची वेळ काय आहे.

हिंदू धर्मातील मान्यतांनुसार, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. कारण, देवतांमध्ये श्री गणेशाचे सर्वप्रथम पूजन केले जाते. तसेच श्री गणराय हे बुद्धीची देवता आहेत. ज्योतिषांच्या मते, संकष्टी हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. एखाद्या संकटातून बाहेर निघण्याला संकष्टी म्हटले जाते. यामुळेच आयुष्यातील सर्व समस्यांतून बाहेर पडण्यासाठी भाविक गणेश चतुर्थीचं व्रत, उपवास करतात.

Sankashti Chaturthi Chandroday Time:
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 10 वाजून 06 मिनिटांची आहे.

 

Sankashti Chaturthi march 2023

error: Content is protected !!