पुणे प्रार्थना समाजातर्फे हरी मंदिर प्रवेशाला 114 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल चैत्रोत्सवाचे आयोजन
पुणे :- पुणे प्रार्थना समाजातर्फे चैत्रोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले. यावेळी “काशीबाई कानिटकर मराठी आद्य लेखिका”या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मृणालिनी कानिटकर जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले.
काशीबाई कानिटकर या मराठी भाषेतील पहिला महिला कादंबरीकार आहेत परंतु त्यांची ओळख केवळ लेखक म्हणूनच नव्हे तर त्यांनी महिला शिक्षण, महिला विरोधी सामाजिक आणि पारंपारिक रूढी परंपरा यांच्या विरोधातही आवाज उठवला होता. त्यामुळे काशीबाई कानिटकर यांचे स्त्री चळवळीसाठी मोठे योगदान आहे. हे योगदान समाजासमोर येणे गरजेचे आहे, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
काशीबाई कानिटकर यांचा जन्म मेनवली येथे 1861 साली झाला वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पंढरपूर या ठिकाणी घरासमोर शाळा असूनही केवळ स्त्री-पुरुष विषमते पोटी त्यांना शिक्षण घेता आली नाही परंतु त्यांनी जिद्द न सोडता घरामध्येच प्रयत्न करून अक्षर ओळख करून घेतली शिक्षण घेतानाच केवळ घरामध्येच नव्हे तर समाजामध्ये स्त्रियांना असणारा दुजाभाव त्या टिपत गेल्या. याच गोष्टी त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये ऊतरवल्या.
रंगराव ही त्यांची प्रकाशित झालेली पहिली कादंबरी ज्यामुळे त्या मराठी भाषेतील पहिल्या कादंबरीकार ठरल्या.