अनंतरंग ॲकॅडमी ऑफ आर्ट्स तर्फे ‘अंनतरंग’ चित्रप्रदर्शनाचे आयोजन
painting-exibition-puneपुणे : उद्योग व्यवसायात स्वत:ची ओळख निर्माण केलेली व्यक्तीमत्वे पण प्रत्येकाचा छंद मात्र रंगरेषांमध्ये रमण्याचा. अशा 26 हौशी कलाकारांनी रेखाटलेली चित्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे ती अनंतरंग ॲकॅडमी ऑफ आर्ट्स आयोजित ‘अंनतरंग’ चित्रप्रदर्शनात.
प्रत्येक चित्रकाराची कलाकृती आपले वेगळेपण सिद्ध करणारी अशी आहे. ‘अंनतरंग’ हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात येणार असून प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 25 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध चित्रकार रवी देव आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. दि. 26 ते 29 एप्रिल या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात पुणेकरांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य खुले असणार आहे.painting-exibition-pune
छंद म्हणून चित्रकला जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन देणे हा अनंतरंग ॲकॅडमीचा मुख्य उद्देश आहे. अनंतरंग ॲकॅडमीच्या वतीने भरविण्यात येत असलेले यंदाचे 16वे प्रदर्शन आहे. प्रदर्शनात 26 कलाकारांच्या चित्रकृती मांडण्यात येणार आहेत. आपला उद्योग-व्यवसाय सांभाळून या कलाकारांनी आपली कला जोपासली आहे. व्यवसायाने काही शिक्षक, अभियंता, गणितज्ज्ञ, आहारतज्ज्ञ तर काही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. उद्योग व्यवसायात कार्यरत असलेल्या व्यक्तिंबरोबरच काही गृहिणींच्या कलाकृतीही प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. ललित कलांचे प्रशिक्षण घेतलेल्या काही चित्रकारांच्या कलाकृतीही पहायला मिळणार आहेत, अशी माहिती अनंतरंग ॲकॅडमीचे संचालक चित्रगुप्त भिडे यांनी दिली. पेन्सिल शेडींग, वॉटर कलर, पोस्टर कलर्स, ऑईल पेंटिंग, पेन अँड इंक अशा विविध माध्यमातून साकारलेली 120 चित्रे प्रदर्शनात असणार आहेत.painting-exibition-pune
चित्रगुप्त भिडे यांना लहानपणापासून कला प्रांताविषयी विशेष ओढ होती. ते उत्तम व्यावसायिक छायाचित्रकार, कलाकार, रंगभूषाकार आहेत. त्यांचे वडिल अनंत भिडे हे शिक्षकी पेशात होते. त्यांनी अनेक चित्रकार घडविले आहेत. हौशी कलाकारांना मार्गदर्शन करण्याचा वडिलांकडून मिळालेला वारसा चित्रगुप्त भिडे पुढे नेत आहेत.painting-exibition-pune