उष्माघातामुळे ११ श्री सदस्यांचा झालेला मृत्यू हि अत्यंत दुर्दवी घटना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
cm-eknath-shinde-on-sunstroke
मुंबई :-ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने ( १६ एप्रिल ) गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होते. नवी मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या काही सदस्यांना उष्माघात झाला त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवावे लागले . दुर्दैवाने उपचार सुरु असताना त्यापैकी काही जणांचा मृत्यू झाला .cm-eknath-shinde-on-sunstroke
राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत देण्यात येणार असून उपचार घेत असलेल्या श्री सदस्याचा खर्च शासनामार्फत केला जाईल आणि असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगीतले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची संवाद साधला.त्याचबरोबर डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराबाबद माहिती घेतली . cm-eknath-shinde-on-sunstroke
तसेच रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या .यावेळी माध्यम प्रतिनिधी सोबत बोलताना त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातलगांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपयुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगीतले .cm-eknath-shinde-on-sunstroke