संत निरंकारी मिशन तर्फे विश्वव्यापी रक्तदान अभियानाचे आयोजन
vishyavyapi-blood-donation-campपुणे : २४ एप्रिल हा देशविदेशांमध्ये मानवतेचे मसीहा बाबा गुरचरणसिंह याच्या स्मृतिप्रित्यर्थ मानव एकता दिवस या रूपात साजरा केला जातो या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी, मानव कल्यानार्थ संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या माध्यमातून मिशनचे पुण्याचे मुख्यालय गंगाधाम येथे रक्तदानाचे महा अभियान राबवण्यात येणार आहे, त्यामध्ये मिशनचे अनुयायी मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत .vishyavyapi-blood-donation-camp
गुरुबचन सिंह जी यांनी समाज उत्खननासाठी अनेक कल्याणकारी योजना केल्या त्यामध्ये नशा मुक्ती तसेच युवा वर्गाला खेळांच्या प्रति प्रेरित करणे. तोच प्रेरक संदेश जीवनात उतरवत निरंकारी मुक्त लोक कल्याणअर्थ आपल्या सेवा प्रदान करत आले आहे .
श्री ताराचंद करमचंदानी यांनी या अभियानाची विस्तृत माहिती दिली यावेळी बोलताना ते म्हणाले, हे महाअभिमान भारतातील संत निरंकारी मिशनच्या सर्व ९९ झोन मधील बहुसंख्य शाखांमध्ये राबविले जाईल, त्यामध्ये रक्तदान शिबिराच्या आयोजनापूर्वी केली जाणारी तपासणी व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. मिशनचे सेवादार संपूर्ण आठवडाभर गंगाधाम परिसरातील घराघरांमध्ये जाऊन नागरिकांना रक्तदानाविषयी जागरूक करत आहेत.ठिकठिकाणी पथनाट्य आणि रॅलीच्या माध्यमातून प्रेरणा देखील दिली जात आहे.vishyavyapi-blood-donation-camp