एका सात्विकतेच्या पर्वाची अखेर..
मुंबई : Sulochana-lathkar-passed-away हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला.सन 1943 साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले .
चित्रपटात अभिनेत्री, चरित्र अभिनेत्री, घरंदाज आई म्हणून त्यांनी काम केले. भालजी पेंढारकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले .
व्हेंटिलेटर वर सुरू होते उपचार
Sulochana-lathkar-passed-away
धाकटी जाऊ, मोलकरीण, साधी माणसं, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे त्या घराघरात पोहोचल्या.
दादर येथील एका खाजगी रुग्णालयात एक महिन्यापूर्वी त्यांना दाखल केले होते. श्वासामध्ये येणाऱ्या समस्ये संदर्भात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालवली आणि रविवारी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त करतात रुपेरी पडद्यावरील सात्विक सोज्वळ वात्सल्य मूर्ती हरपली अशी श्रद्धांजली मराठी क्षेत्रातील कलाकारांनी वाहिली.
कर्नाटक आणि कोल्हापुराशी विशेष जवळीक
कर्नाटकातील सीमा भागातून कोल्हापुरात सुलोचना दिदी आल्या त्यांचे कोल्हापूर हे माहेर आणि जयप्रभा स्टुडिओ ही कर्मभूमी ठरली .
पुढे हिंदी सिनेमा काम करताना त्यांनी हा परिसर सोडला तरी त्यांचं कोल्हापूर प्रेम आणि आपुलकी मात्र कायम होती त्यांचा अभिनय प्रवास सासुरवास या चित्रपटापासून सुरू झाला त्यांना भालजी पेंढारकर यांनी सुलोचना हे नाव दिले.
250 हिंदी चित्रपट आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटात केले काम
Sulochana-lathkar-passed-away
सुलोचना दीदी यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका केली. दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्या सोबतही सुलोचना दिली यांनी चित्रपटामध्ये काम केले आहे. यांची कारकीर्द अत्यंत मोठी होती आपल्या करिअरमध्ये त्यांनी तब्बल 250 हिंदी चित्रपटांमध्ये आणि पन्नास हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. आणि अभिनयाची छाप पाडली. महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा असा 2009 चा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार अभिनेत्री सुलोचना यांना दिला गेला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुलोचना दीदींना मदत
Sulochana-lathkar-passed-away
मार्च महिन्यात सुलोचना दिदींची तब्येत खराब झाली. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दिदी यांच्या सर्व उपचारांचा खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले होते. इतकेच नाही तर तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख रुपये ही देण्यात आले होते.
चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांच्या वलयात जडणघडण झालेल्या दीदींचे चित्रपटसृष्टीतील योगदान अमूल्य आहे. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ त्यांनी दाखवला जो चिरंतन स्मरणात राहील आणि ज्यात सुलोचना दीदी हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले असेल हे निर्विवाद सत्य.