ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
registration-eshram-portal
पुणे, दि.२ : जिल्ह्यातील असंघटीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे.
मनरेगा मजूर, स्वयंसहायता गट, फेरीवाले, रिक्षा चालक, इमारत व इतर बांधकाम कामगार, मध्यान्ह भोजन कामगार, घरेलू कामगार, अशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, शेतमजूर, मच्छिमार, विटभट्टी कामगार यासारख्या असंघटीत कामगारांनी पोर्टलवर नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी कामगार उपायुक्त कार्यालय, शक्ती चेंबर्स, सर्वे क्र. ७७/१, २ रा, 3 रा आणि ४ था मजला, संगमवाडी पुणे-४११००३ येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
registration-eshram-portal