शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या विकासाला प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर new-education-policy
new-education-policy
पुणे दि. 23 नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिवाजीनगर येथील सभागृहात आयोजित निपुण भारत अभियाना अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान तसेच नवीन शैक्षणिक धोरण याविषयी होणाऱ्या शिक्षण परिषदेच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते .new-education-policy
विद्यार्थ्यांना नोकरी देणारे शिक्षण मिळावयास हवे, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आज विकसित देशात कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्या देशांना आपण मनुष्यबळ पुरवू शकतो .त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व समावेशक कौशल्यावर आधारित शिक्षण असावे शिक्षण क्षेत्रात काही स्वयंसेवी संस्था चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.
सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातूनही शिक्षण क्षेत्रात चांगले काम होत आहे .मुंबई कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल. लोणावळा येथे होणाऱ्या परिषदेत कौशल्य विकासावरील 10 चांगले विषय निवडावेत.new-education-policy
विद्यार्थी संख्या कमी असेल अशा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
मुंबईत 500 शिक्षक अधिसंख्य आहेत. त्यांचे अन्य ठिकाणी समायोजन करण्यात येईल. शाळेत सर्व पायाभूत सुविधा असाव्यात, शाळेचा परिसर स्वच्छ असावा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली.new-education-policy