मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीच्या शुभारंभ
मेट्रो ३ प्रकल्प मुंबईकरांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केला.
मुंबई मेट्रो ३ मुळे रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होऊन सुमारे २.३० लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. जी झाडे तोडावी लागली, त्यांनी जितके कार्बन शोषून घेतले असते, मेट्रोमुळे केवळ ८० दिवसात तेवढे कमी उत्सर्जन होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
#मुंबईमेट्रो
#MumbaiInMinutes