महाराष्ट्रदिनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ”आपला” दवाखान्यांचे लोकार्पण
सोलापूर, दि. 30 – नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. राज्यातील शहरी भागातील जनसामान्य गोरगरीब झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी घोषित करण्यात आलेल्या या योजनेचे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ९ ठिकाणी आपले दवाखाने सुरू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे दवाखाने नागरिकांच्या सेवेत समर्पित करण्यात आले.
जिल्ह्यातील आपला दवाखाना ठिकाणे पुढीलप्रमाणे – अक्कलकोट शहर – अक्कलकोट नगर परिषद नगरपालिका मराठी शाळा माणिक पेठ अक्कलकोट, बार्शी शहर – बार्शी नगरपरिषद लोढा प्लॉट बार्शी, माढा शहर – कुर्डूवाडी नगरपरिषद नागरिक आरोग्य केंद्र कुर्डवाडी, माळशिरस – माळशिरस नगरपंचायत नगरपंचायत इमारती आवार माळशिरस, मंगळवेढा शहर – मंगळवेढा नगरपरिषद योग भवन नाका मंगळवेढा, मोहोळ शहर – मोहोळ नगरपरिषद दत्त मंगल हॉल मोहोळ, पंढरपूर शहर – पंढरपूर नगरपरिषद क्लॉक रूम सांगोला नाका पंढरपूर. सांगोला शहर – सांगोला नगरपरिषद जि. प. शाळा चांदोलीवाडी सांगोला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे म्हणाल्या, ‘आपला दवाखाना’ मध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, 30 प्रकारच्या प्रयोग शाळा चाचण्या, मोफत कार्यशाळा तपासणी, टेलि कन्सल्टेशन, गर्भवती माताची तपासणी, लसीकरणच्या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय मानसिक आरोग्यासाठी समुपदन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषता संदर्भ सेवा, योगा व व्यायामबाबतीचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार आहेत.