घरोघरी गणपतीचे जल्लोषात स्वागत .
राज्यभरात घरोघरी गणपती चे उत्साहात स्वागत करण्यात आले ज्यात लहान मुलांबरोबरच मोठ्यांमध्ये पण उत्साहाचे वातावरण होते.
कोरोना काळानंतर ह्या वर्षी पहिल्यांदाच निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सरकारनी परवानगी दिली आहे त्या मुळे जागोजागी रस्त्यांवर जल्लोषाचे वातावरण दिसून आले.
तसेच घरोघरी व्यंजनचा सुवास दरवळू लागला.
१० दिवस ह्याच उत्साहात पण नियमांचे पालन करून गणेशउत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.