Monday, December 16, 2024
Newsमहाराष्ट्र

कारागृहांवर आता ड्रोन ची नजर..

drone-camera-for-jail-security मुंबई : कारागृह सुरक्षा बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील कारागृहांवर आता ड्रोन ची नजर असणार आहे,त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे ,अशी माहिती माननीय अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे पश्चिम विभाग कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय श्री सुनील धुमाळ,येरवडा कारागृह अधीक्षक श्रीमती राणी भोसले,प्राचार्य दौलतराव जाधव, तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा श्री चंद्रवणी इंदुरकर, इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.drone-camera-for-jail-security
12 ड्रोन विविध कारागृहातील बारीक गोष्टींवर हालचाली टिपणार आहेत. रात्रीच्या वेळी ही चित्रीकरण करण्यात येणार असुन विशेषतः कारागृहात होणाऱ्या घटना आणि कैद्यांबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी याची मदत होणार आहे .

प्रायोगिक तत्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर नासिक संभाजीनगर तळोजा ठाणे, अमरावती नागपूर कल्याण आणि चंद्रपूर या ठिकाणी ड्रोन पाहणी सुरू करण्यात आली आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारनेही तातडीने ड्रोन तेहाणीसाठी प्राधान्य दिले आहेत उत्तर प्रदेश राज्याने देशात प्रथम कारागृह सुरक्षा बळकटी करण्यासाठी ड्रोन कॅमेरा चा वापर सुरू केला होता. महाराष्ट्र राज्य कारागृह सुरक्षा बलकती करण्यासाठी ड्रोन वापरणार वापरणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले आहे.

drone-camera-for-jail-security

error: Content is protected !!