शेतकऱ्याने साधली अंजीर शेतीतून प्रगती-fig-farming
fig-farming
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजिर,सीताफळ, लागवडीसाठी अग्रेसर आहे . या तालुक्यातील सिंगापूर या गावाचे प्रगतिशील शेतकरी अभिजीत गोपाळ लवांडे यांनी ३० गुंठयावरील अंजिराच्या शेतीतून १४ टन विक्रमी उत्पन्न घेतले . आणि १० लाख रुपय नफा मिळवला त्यांना कृषी विभागाकडून शेततळ्याचा लाभ तसेच कृषीविषयक प्रशिक्षण मिळाले असून त्याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे .
कोरोना महामारीच्या काळात नोकरी गेली त्यानंतर अभिजीत यांनी आपले लक्ष पूर्णपणे शेतीकडे वळवले त्यांची ९ एकर शेती आहे . आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी आपली शेती बागायती केली .
त्यानंतर ४ एकर मध्ये ६०० अंजीर ची झाडे लावली .या अंजीर बागेतून ७ ते ८ लोकांना रोजगार मिळाला . श्री लवांडे हे शेती पूरक व्यवसाय म्हणून रोपवाटिकेच्या व्यवसाय करतात .
महाराष्ट्रासह हैद्राबाद, गुजरात राजस्थान आदी ठिकाणचे शेतकरी श्री. लवांडे यांची अंजीर बाग पाहवयास येतात व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात.
त्यांच्या अंजीर बागेत ७ ते ८ लोकांना नियमित रोजगार भेटला असून ही देखील एक जमेची बाजू आहे. श्री. लवांडे यांनी अंजिराचे नवीन सुधारित वाणही तयार केले आहेत.
संद्रिय शेतीच्या वापराचा भरपूर फायदा झाला असे त्यांनी यावेळी सांगितले .
अंजिराच्या चांगल्या उत्पादनासाठी इतर शेतकऱ्यांपेक्षा बहार धरण्याचे महिने बदलले, पाचटांचा वापर करुन जिवाणूंची संख्या वाढवली, झाडांच्या भोवती पाचटांचे अच्छादन करुन कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्याकडे भर दिला, यांत्रिकीकरणावर जास्त भर दिला, तोडलेला माल बागेतून बाहेर काढणे आणि फवारणीसाठी आधुनिक यंत्रणा वापरण्याकडे भर दिला. त्यांनी वेळोवेळी कृषि विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेतले.
अंजिर बागेचा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यापाठीमागे उपविभागीय कृषि अधिकारी बारामती वैभव तांबे, तालुका कृषि अधिकारी पुरंदर सूरज जाधव यांचे श्री. लवांडे यांना मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती ऐवजी आधुनिक शेतीकडे वळावे .
कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या संधीचा लाभ घयावा असे हि त्यांनी सांगितले .