जागतीक पर्यावरण दिन
world-environment-day
जागतीक पर्यावरण दिन त्यानिमित्ताने मनातलं
दररोज सकाळी डोळे उघडले की माझी पावलं वळतात ती आमच्या टेरेसवरच्या छोट्याश्या गार्डनकडे .बर्याच दिवसांपासून हे माझे रुटीन बनले आहे.
आमच्या फ्लॅटमधल्या टेरेसवर काही महिन्यांपूर्वी छान फुलांची छोटी छोटी रोपं आम्ही आणली.
त्यामध्ये फुलझाडे तसेच तुळस, कोरफड आणि कडिपत्ता पण आहेत. ही झाडं आणली तेव्हा अगदी लहान होती .
त्यानंतर त्यांना पाणी देणे ,पंधरा दिवसांनी खत देणे त्या सर्व झाडांना वाढताना,
फुलताना बहरताना पहात आम्ही सर्वजण त्यांच्यात गुंतून गेलो.
वाढणारी झाडे आणि त्यांना येणारी सुगंधी फुले पाहून मन प्रसन्न होतं.दिवस छान जातो.
आणि ह्याच्याशिवाय खरचं आपण अपुर्ण आहोत असं वाटतं. world-environment-day
बहरलेली आमची बाग आणि काही दिवसांसाठी गावी जाण्याचा प्लॅन ठरला.
आता झाडांच काय होणार? असा प्रश्न आम्हाला सर्वांनाच पडला.
आम्ही गावी गेलो पण झाडांच काय होत असेल याचा विचार सारखा अस्वस्थ करत होता..
जेव्हा परत आलो तेव्हा आधी टेरेसवर जाऊन पाहिलं तर बरीच फुलझाडं टवटवीत होती..काही कोमेजली होती टेरेसवर वाळलेल्या जास्वंदाच्या फुलांचा सडा पडला होता. हा एक चमत्कारच होता..
मनात सारखा एकच विचार येत होता की ही विनायकची विघ्नहर्त्यावरची निस्सीम श्रद्धा का?
फक्त जास्वंदीची झाड टवटवीत?
काही दिवसानंतर मला आमच्या वरच्या फ्लॅटमध्ये रहाणारी एका मुलीने, मराठी तर नाहीचं पण तोडक्या मोडक्या हिंदीतून मला सांगीतले..दिदी मैने आपके पौधोको पानी दिया था..जब आप नही थे यहाॅ..जहाॅतक पाॅसीबल था..वहातक पाणी फेकती थी मै..
ओळख नसताना दुसर्यांची झाड वाचावी म्हणुन तिची तळमळ आणि झाडांच काय होत असेल ह्या विचाराने सारखं उदास होणारं माझ मन.शेवटी माझी झाडं वाचली..इच्छा तिथे मार्ग याची मला प्रचिती आली.
जागतिक पर्यावरण दिन माहिती आणि महत्व
जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन द ह्यूमन एन्व्हायर्नमेंट (५ जून १९७२) येथे केली, ज्याचा परिणाम मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर झालेल्या चर्चेतून झाला होता. दोन वर्षांनंतर, १९७४ मध्ये “फक्त एक पृथ्वी” या थीमसह पहिला जागतिक पर्यावरण दिन आयोजित करण्यात आला.
पर्यावरण सुरक्षित असणे गरजेचे
आपली पृथ्वी आणि जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण सुरक्षित असणे आवश्यक आहे .
सध्या लोक अश्या प्रकारे जीवन जगत आहे ते पाहता पर्यावरण धोक्यात धोक्यात आले आहे .माणूस आणि पर्यावरण यांचे अतूट नाते आहे निसर्गाशिवाय जीवन शक्य नाही अश्या परिस्थितीत मानवाला निसर्गाशी जुळवून घयावे लागेल
पहिला पर्यावरण दिन कोणत्या देशाने साजरा केला
पहिला पर्यावरण दिन स्वीडन ची राजधनी स्टॉकहोम येथे साजरा करण्यात आला .
१९७२ मध्ये स्टोकहोम येथे पहिली पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती .ज्यामध्ये १९९ देश सहभागी झाले होते .
झाडे लावा झाडे जगवा..
मनुष्य आणि पर्यावरण एकमेकांवर अवलंबून आहे. प्रदूषण किंवा झाडांची कमतरता या पर्यावरणीय प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी शरीरावर आणि आरोग्यावर होतो.मानवाच्या चांगल्या सवयी जसे की झाडांची जोपासना करणे. प्रदूषण रोखणे,स्वच्छता राखणे या साऱ्या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात.मानवाच्या वाईट सवयी जसे की