Sunday, December 22, 2024
Informationलेख

का साजरा करतात जागतिक महिला दिन?

women’s day

आपल्या समाजात असलेल्या सर्व स्त्रियांविषयी आपल्या मनात असलेला सन्मान व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण हा दिवस नक्की काय आहे? का साजरा करायचा? यासंबंधीची माहिती फार कमी जणांना माहीत आहे जवळपास एक शतकाहून जास्त काळ लोटला असेल .8 मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो .
यामागे एक कारण आहे ते म्हणजे क्लारा झेटकीन या महिलेने 1910 या वर्षी जागतिक महिला दिनाची सुरुवात केली होती.
या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला .womens day
इसवी सन 1908 साली 15000 महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरून मोर्चा काढला त्यामागे काही कारणं होती ती म्हणजे कामाचे कमी तास, चांगला पगार मिळणे आणि मतदानाचा अधिकार अशा त्या महिलांच्या काही मागण्या होत्या. त्यानंतर सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली, आणि हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने.क्लारा या साम्यवादी विचारसरणीच्या होत्या तसेच त्या महिला हक्कांच्या पुरस्कर्त्याही होत्या. कालांतराने त्यांची ही मागणी मान्य झाली आणि पहिल्या जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये साजरा झाला.
पण आठ मार्च हीच तारीख का
क्लारा यांनी जेव्हा महिला दिवसाची संकल्पना मांडली तेव्हा त्यांच्या मनात कोणतीही तारीख नव्हती.
ती तारीख ठरली 1917 साली तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि त्याचं दरम्यान रशियन महिलांनी भाकरी आणि शांतता अशी मागणी घेऊन संप पुकारला, चार दिवसांनी राजकीय उलथा पालथ झाली रशियन झार यांना आपलं पद सोडावं लागलं, त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. ती तारीख होती आठ मार्च त्यामुळेच त्या ऐतिहासिक संपाची आठवण म्हणून आज आठ मार्च चा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो .
त्यानंतर भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च 1971 रोजी पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या त्यांच्या संघटना स्थापन केल्या गेल्या त्या संघटनांना बळकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीत काही प्रश्नांचे स्वरूप बदलले गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या आता अनेक बँका आणि कार्यालयांमधूनही 08 मार्च साजरा व्हायला लागला आहे.
भारतात महिलांना पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन ह्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात.महिलांनी प्राप्त केलेल्या यश आणि कीर्तीचा आढावा घेऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जाते.
यामध्ये स्त्री स्वातंत्र्य , महिला सुरक्षा हे आणि यासारखे इतर अनेक मुद्दे आहेतच.
पण मागील काही वर्षांपासून अनेक समविचारी महिला एक बदल म्हणुन , निखळ आनंदासाठी या दिवशी एकत्र येतात.
एकत्र जेवणाचा आस्वाद , ड्रेसकोड आणि उत्साहात हा दिवस साजरा केला जातो
.

error: Content is protected !!