मराठी साहित्य संमेलन ७२ वर्षानंतर अंमळनेरला -sahitya-sammlen-amlaner
sahitya-sammlen-amlaner
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून घेण्यात येणारे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२४ मध्ये अमळनेर येथे सजणार आहे. ही माहिती महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी पुण्यात जाहिर केली.
१९५२मध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनानंतर तब्बल ७२ वर्षांनी अमळनेर मध्ये संमेलन होणार आहे.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळ निश्चिती समिती गठित करण्यात आली होती.या समितीमध्ये महामंडळाच्या कार्यवाह डॉक्टर उज्वला मेहेंदळे,उपाध्यक्ष रमेश वन्सकर ,प्रदीप दाते, किरण सगर, सुनीताराजे पवार, आणि डॉक्टर नरेंद्र पाठक सहभागी होते .sahitya-sammlen-amlaner
या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले .या तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता याचा विचार करून स्थळ निवड समितीने सर्वानुमते मराठी वांग्मयमंडळ अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली.
वर्धा येथे पार पडलेल्या संमेलनानंतर पुढील संमेलन कुठे होणार याची सगळ्यात साहित्य वर्तुळात चर्चा होती ९७ वे संमेलन हे कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र येथे होईल अशी अटकळ बांधली जात असताना अमळनेर येथे संमेलन होणार असल्याने हा उत्तर महाराष्ट्र येथील साहित्यिक आणि साहित्य रसिकांनासुखद धक्का आहे.sahitya-sammlen-amlaner