MPSC-८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात काढली आहे
महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात काढली आहे. आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले. mpscफक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा. या पद भरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
विभाग – विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
वेतनश्रेणी – S-14 : रुपये 38600 – 122800 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 70 आणि 08
पदाचे नाव – राज्य कर निरीक्षक sales tax
विभाग – वित्त विभाग
वेतनश्रेणी – S-14 : रुपये 38600 – 122800 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 159
पदाचे नाव – पोलीस उप निरीक्षक
विभाग – गृह विभाग
वेतनश्रेणी – S-14 : रुपये 38600 – 122800 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 374
पदाचे नाव – दुय्यम निबंधक (श्रेणी – 1) / मुद्रांक निरीक्षक
विभाग – गृह विभाग
वेतनश्रेणी – S-14 : रुपये 38600 – 122800 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 49
पदाचे नाव – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
विभाग – गृह विभाग
वेतनश्रेणी – S-12 : रुपये 32000 – 101600 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 06
पदाचे नाव – तांत्रिक सहायक
विभाग – वित्त विभाग
वेतनश्रेणी – S-10 : रुपये 29200 – 92300 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 1
पदाचे नाव – कर सहायक
विभाग – वित्त विभाग
वेतनश्रेणी – S-8 : रुपये 25500 – 81100 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 468
पदाचे नाव – लिपिक – टंकलेखक
विभाग – मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये
वेतनश्रेणी – S-6 : रुपये 19900 – 63200 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 7034
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – 2023
वार आणि दिनांक
शनिवार, दिनांक 2 सप्टेंबर 2023
परीक्षा
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023
वार आणि दिनांक
शनिवार, दिनांक 9 सप्टेंबर 2023
या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील पदसंख्या, आरक्षणाच्या संदर्भातील तरतुदी, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, शारीरिक अर्हता, निवडप्रक्रिया, या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. भरती प्रक्रियेच्या संदर्भातील अधिकृत आणि सविस्तर जाहिरातीसाठी https://mpsc.gov.in/downloadFile/english/6609 या लिंकवर क्लिक करा.
अर्ज सादर करण्यासाठी MPSC Website – https://mpsc.gov.in/
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याचा कालावधी – दिनांक 25 जानेवारी 2023 पासून ते दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी 11.59 वाजेपर्यंत.
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत..
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक – दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी बँकेच्या कार्यालयनीन वेळेत.