करा उन्हाळा सुसह्य -make-summer-bearable
करा उन्हाळा सुसह्य make-summer-bearable
मकरराशीत सूर्याचा प्रवेश झाला की, चाहूल लागते ती उन्हाळ्याची …गरमीने जीव असह्य होते , रात्री एसी कुलरचा कृत्रिम गारवा हवाहवासा वाटतो.दिवस मोठा होऊन जातो, आणि वातावरणातला हा बदल स्वीकारायला आपले शरीर आणि मन सुद्धा थोडासा वेळ घेतेच.
मागील वर्षाच्या उन्हाची ,त्या तीव्रतेची आठवण काढत आपण सर्वच जण यावर्षी काय नवे आणि वेगळे करता येईल याचा विचार करतो.
मोठा दिवस आणि मुलांच्या शाळांना सुट्ट्या त्यामुळे नवीन काय करावं हा प्रत्येक आईच्या डोक्यात अगदी भुंग्यासारखा फिरणारा प्रश्न? make-summer-bearable मग त्यावेळी आम्ही काय करायचो यापासून या सर्वांची सुरुवात होते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला कामाला लावणारा हा उन्हाळा.Make- summer-bearable.
उन्हाळा सुरू होताच समस्त महिला वर्गाची धावपळ सुरू होते ती वाळवणाचे पदार्थ बनवण्याची. ग्रामीण आणि निमशहरी भागातले हे लोण आता शहरातही येऊन पोहोचले आहे. त्यामुळे फ्लॅट संस्कृतीचे टेरेस सुद्धा बऱ्याच वेळा वाळवणांनी भरून गेलेले दिसतात.
शाळा संपलेल्या असल्यामुळे कॅरम, पूर्वीचा बिजनेस/ व्यापार आणि आता त्यातले ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजेच मोनोपाॅली त्याचबरोबर सापसिडी, ल्युडो हे सुद्धा जोडीला असतात.
असे सर्व कपाटातले गेम्स बाहेर निघतात बर्याचदा त्याची खरेदी सुद्धा केली जाते आणि उन्हाळ्याची दुपार हे सर्व खेळ खेळत तसेच थंडगार असे टरबूज खरबूज ही फळ खातं सुसह्य केली जाते.
पण हा उन्हाळा तसा थोडा काळजीचाच त्यामुळे ह्या दिवसात शरीराची विशेष काळजी सुद्धा घ्यावी लागते. भरपूर चालणे, सायकलिंग, पोहणे, टेनिस यासारखे खेळ खेळण्यासाठी उन्हाळा हा योग्य ऋतू आहे.
या खेळामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढते आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो त्यामुळे या दिवसात भरपूर पाणी पिणे, आणि थंड पदार्थांचे सेवन करावे.
त्याचबरोबर चहा कॉफी यासारख्या गरम पेयांचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे.
बदललेल्या निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही.
खरंतर हा निसर्गच आपल्याला काही नियम ठरवण्यास मदत करतो. जसे की मकर संक्रांतीनंतर जरी उन्हाळ्याची चाहूल लागली तरी सुद्धा होळीच्या दिवशी धुलीवंदनाच्या वेळेला थंड पाण्याने होळी आणि रंग खेळून हा सण साजरा करुन यापुढे थंड पाणी वापरण्याचा संकेत आपल्याला निसर्गानेच दिलेला आहे. ज्याचे कारण म्हणजे वातावरणात वाढलेली “उष्णता”
परंतु हा निसर्गच बऱ्याच वेळा स्वतःच घालून दिलेले नियम बदलतो अशावेळी या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतःची काळजी घेणे विशेषतः घरातील लहान मुलांची वयोवृद्धांची काळजी घेणे जास्त आवश्यक. तरच हे ऊष्ण आणि कोरडे हवामान आपण सुसह्य बनवु शकु..
make-summer-bearable