Saturday, December 21, 2024
Informationकृषीलेख

मोगऱ्याचे ”हे” गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का ?jasmine-benefits

jasmine-benefits
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने… तो मोगरा असावा….आज दुपारी इलाही जमादार यांची मराठी गझल ऐकत होते आणि ती ऐकताना त्यातील शब्द न शब्द मनावर कोरला जात होता.

jasmine-benefits

त्यावेळेसच मनात विचार आला, खरंच काय सामर्थ्य असतं या मोगऱ्यात त्याच्या दिसण्यात त्याच्या असण्यात आणि त्याच्या सुगंधात सुद्धा. त्यामुळेच मोगरा आवडणार नाही अशी व्यक्ती दुर्मिळच. छोटसं सुगंधी फुल म्हणून मुलं कौतुकाने त्याला न्यहाळतात.तर नाजूक अशा सुगंधित मोगऱ्याचा गजरा केसात माळून जेव्हा स्त्री घरात ये जा करते तेव्हा सारे घर मोगऱ्यांनी गंधाळले जाते.तारुण्यातील प्रीतीचा मुक साक्षीदार सुद्धा मोगराच होतो आणि देव्हाऱ्यातली प्रसन्नता वाढवतो तो सुद्धा मोगराच .

jasmine-benefits

मोगऱ्याचे अजूनही काही खास गुणधर्म आहेत 

त्वचा आणि केसांसाठी ऊपयुक्त मोगरा

उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची देखभाल करणे अतिशय आवश्यक आहे कारण सूर्यकिरण, गरम हवा आणि उन्हामुळे त्वचेचे खूप नुकसान होते अशावेळी मोगऱ्याचे तेल वापरल्यामुळे त्वचा लाल होणे सनबल त्वचेशी संबंधित अन्य समस्या दूर होण्यास मदत मिळतेjasmine-benefits

.
सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा दिसतात तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात अशावेळी मोगऱ्याच्या तेलाचा वापर उपयुक्त ठरतो.

मोगऱ्याची दहा ते पंधरा फुले पाण्यात भिजत ठेवा या पाण्याने केस धुवा हे पाणी नॅचरल कंडिशनर सारखे कार्य करते. ज्यामुळे केस मऊ होतात मोगऱ्याची फुले टाकलेल्या पाण्याचा उपयोग आपण कंडिशनर म्हणून करू शकतो.

मोगऱ्याच्या फुलांचा रस काढून तो रस केसांना मसाज करण्यासाठी किंवा सिरम म्हणून वापरता येतो .

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग कमी करायचे असतील तर मोगऱ्याचे तेल रुटीन केअर म्हणून लावावे त्यामुळे चेहरा मऊ होईल आणि सुरकुत्या कमी होतील

मोगऱ्याची काही फुलं घेऊन ती फुलं चांगली वाटून घ्या. वाटलेल्या फुलांमध्ये तुम्हाला आवडत असलेला कोणताही बेस घेऊन तो चांगला एकत्र करा. आणि तो पॅक लावा. तुमच्या चेहऱ्याला नॅचरल ग्लो मिळण्यास मदत मिळेल.

हे झाले मोगऱ्याचे केसांसाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त असे गुणधर्म

jasmine-benefits

पण हा मोगरा औषधी सुद्धा आहे बर  

मोगर्याचा सुगंध घेतला तर नाकातील मुरुमांशी समस्या दूर होते.

मोगऱ्याची फुले मधात मिसळून खाल्ल्याने उचकीची थांबते.

ताप आल्यास मोगऱ्याची पाने बारीक करून पिल्याने तशीच ती पाने खाल्ल्याने सुद्धा ताप उतरतो.

मोगरा या वनस्पती पासून अनेक औषधी तयार केले जातात.

असा हा बहुगुणी मोगरा आपल्या सुगंधाने तन मन धुंध करतो.

error: Content is protected !!