Sunday, December 22, 2024
Informationलेखसंस्कृती

एकादशी : विष्णुपुराण काय सांगते ?

ekdashi-vishnupuran-kay-sangte

ekdashi-vishnupuran-kay-sangte

चैत्र महिन्यात येणारी एकादशी म्हणजे चैत्र एकादशी, जी कामदा एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी, कार्तिकी या दोन मुख्य एकादशी असल्या तरी वर्षात येणाऱ्या इतर एकादशीचे सुद्धा विशेष महत्व आहे. या निमित्त अनेक भाविक पंढरीची वारी करतात. आजच्या दिवशी दीड ते दोन लाख भाविक पंढरपुरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आजच्या दिवशीचे उपवास केल्याने भाविकांची पुनरजन्माच्या चक्रातून सुटका होते अशी धारणा आहे. कामदा एकादशीचं व्रत अत्यंत पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की कामदा एकादशीचं व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताने कित्येक पटींनी जास्त पुण्य मिळतं.

ekdashi-vishnupuran-kay-sangte

                  काय आहे कामदा एकादशीची कथा

प्राचीन काळी भोगीपूर नावाचे नगर होते, तेथे पुंडरिक नावाचा राजा राज्य करत असे. हे शहर खूप आनंदी होते. या नगरीत अनेक अप्सरा, किन्नर आणि गंधर्व वास्तव्यास होते असे म्हणतात. त्यांच्यात ललिता आणि ललित यांच्यात खूप स्नेह होता, दोघेही अतिशय आलिशान घरात राहत होते.

एके दिवशी गंधर्व ललित दरबारात गात होते. गाताना त्यांना अचानक त्यांची पत्नी ललिताची आठवण झाली. आपल्या पत्नीच्या आठवणीत ललित इतके व्याकूळ झाले की आपण दरबारात गात आहोत हेही ते विसरले आणि सहाजिकच त्याचा परिणाम त्यांचा गाण्यावर झाला. गाण्याचे सूर बिघडू लागले. करकट नावाच्या सापाला हे समजलं आणि त्याने ही गोष्ट राजाला सांगितली. राजा रागावला आणि त्याने ललितला तू राक्षस होशील असा शाप दिला.ekdashi-vishnupuran-kay-sangte

ही गोष्ट ललितची पत्नी ललिता हिला कळली आणि तिला फार वाईट वाटलं. आपल्या पतीला वाचवण्याचा विचार ललिता करू लागली. ती शृंगी ऋषींच्या आश्रमात गेली आणि प्रार्थना करू लागली. शृंगी ऋषी म्हणाले की हे गंधर्व कन्ये ! तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस? तेव्हा ललिताने स्वतःबद्दलची सर्व माहिती ऋषींना दिली आणि पतीच्या उद्धारासाठी उपाय विचारला.

ऋषी म्हणाले की आता चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे, जिचे नाव कामदा एकादशी आहे. कामदा एकादशीचे व्रत करून त्या एकादशीचं पुण्य पतीला अर्पण केल्यास तो असुर योनीपासून मुक्त होईल. ललिताने ऋषींच्या आज्ञेचं पालन केले आणि एकादशी व्रताचे फळ मिळताच तिचा पती राक्षस योनीतून मुक्त झाला आणि त्याचे जुने रूप पुन्हा प्राप्त झाले.

त्यानंतर हे दोघं पुन्हा एकदा आनंदाने राहू लागले. विष्णू पुराणात या कथेचा संदर्भ पाहायला मिळतो.

युधिष्ठीराच्या विनंतीवरुन हीच कहाणी श्रीकृष्णाने युधिष्ठीराला सांगितली होती.

Shweta Kulkarni

Journalist | Writer | Anchor | Blogger

error: Content is protected !!