अशी घेऊया झाडांची काळजी…
झाडं जोपासावी अशी easy-tips-to-maintain-your-garden
अंगणात लावण्यासाठी, घरात ठेवण्यासाठी छान छान फुलझाडे असावी असं प्रत्येकालाच वाटतं.easy-tips-to-maintain-your-garden त्यातच नवीन घर असेल घरासमोर छानशी मोकळी जागा असेल, किंवा फ्लॅटमध्ये सुद्धा ऊन येणारा टेरेस असेल,तर किती आणि कसे फुल झाडे लावू हा विचार प्रत्येकाच्याच मनात येत असतो.
पण बऱ्याच वेळा असं होतं की उत्साहाच्या भरात अनेक सुवासिक अशा फुलझाडांच्या रोपांची खरेदी केली जाते. यामध्ये गुलाब,जाई, जुई, मोगरा,चांदणी ही झाडे खरेदी केली जातात.
काही वेळा पावसाळ्याच्या दिवसात ती छान लागतात त्याला फुले येतात पण अचानक काही दिवसानंतर झाडे सुकायला लागतात त्यांचा बहर जरी कमी होऊन संपूर्ण झाड कोमेजून जातं.वाचा आमच्या वेबसाईट वर
मूड फ्रेश राहण्यास मदत
फुलांची किंवा शोभेची रोपं अतिशय छान अशा आकर्षक रंगांची आणि आकारांची असतात. वेगवेगळ्या आकाराच्या, डिझाईन्सच्या कुंड्यामध्ये ही रोपं लावल्यास आपल्याला सकाळी उठल्यावर त्यांच्याकडे पाहून फ्रेश वाटू शकते. इतकेच नाही तर दिवसभर आपण खूप थकून घरी आलो आणि ही रोपं छान आनंदानं डुलत असतील तरी आपला मूड फ्रेश होण्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. हल्ली पाण्याची आवश्यकता नसणारी, मातीशिवाय राहणारी अशी बरीच शोभेची रोपंही बाजारात मिळतात. घरात एखाद्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या कोपऱ्यांत ही रोपं ठेवल्यास सगळ्यांचाच मूड बदलण्यास मदत होईल.
वेळ जाण्याचे उत्तम माध्यम
अनेकदा आपण ऑफीसचे ताण, घरातील कामे, बाकीच्या गोष्टींचे टेन्शन असे घेऊन थकून जातो. अशावेळी आपल्याला काहीतरी छान आणि वेगळे करायचे असते. वीकेंडला थोडा मोकळा वेळ मिळाला की आपल्या हातात मोबाईल असतो नाहीतर आपण साफसफाई करत असतो. अशावेळी आपण छानशी रोपं आणून त्यांच्यासाठी कुंड्यांची सजावट केले तर आपल्याला फ्रेश वाटते. या रोपांची कापणी करणे, त्यांना खत घालणे, त्यांना प्रेमाने कुरवाळणे असे केल्यास ही रोपं आणखी जोमाने वाढतात आणि खुलून येतात. याबरोबरच आपला वेळही छान जातो आणि नकळत मूड फ्रेश होतो ते वेगळेच.
देखभाल कशी करावी खत कोणते घालाव
अशा वेळेला वाटतं त्यांची देखभाल कशी करावी खत कोणते घालावं? पाणी आपण जास्त तर घालत नाही ना ?
असे अनेक प्रश्न स्वतः होतात. अनेक प्रकार करून सुद्धा जेव्हा झाड जगत नाही त्या वेळेला नकोच ती झाड आणि ती कट कट असाही विचार डोक्यात येतो.
आज या झाडांची देखभाल कशी करावी याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा .
पोस्ट शेवटपर्यंत वाचा
खरंतर झाडांची देखभाल करणे हे अत्यंत सोपं आहे हा विचार मनात आधी रुजायला हवा .
- झाडांना पाणी देताना ते गरजेप्रमाणे द्यावे.
- अगदी रोज पाणी घालायची गरज नाही दोन ते तीन दिवसातून एकदा पुरेसं पाणी दिलं गेलं पाहिजे.
- पाणी देताना झाडाच्या मुळाशी थेट पाणी घालू नये ते पाणी कुंडीत कडेकडेने सावकाश घालावं.
- माती हळूहळू भिजत जाते कुंडीतील सगळी माती व्यवस्थित भिजली की पाणी देण्यास थांबवावे.
- बऱ्याच वेळा पाणी दिल्यानंतर ते मुळापर्यंत पोहोचतच नाही अशावेळी पाणी मुळापर्यंत पोहोचते आहे का याचा अंदाज घेत पाणी द्यावे.
- कुंडीला खालच्या बाजूला एक छिद्र असले तर त्या छिद्रावर खापराचा तुकडा ठेवावा जेणेकरून पाणी खाली झिरपेल पण माती वाहून जाणार नाही .
- दुसरा थर दोन ते तीन इंचाचा मातीचा आणि पालापाचोळा शेणखत हा द्यावा. नंतर माती टाकून त्यात झाड घट्ट बसवावे.
- झाडांना रासायनिक खत टाळावी नैसर्गिक खतांचा वापर बागेसाठी करावा.
- रासायनिक खतांमुळे लगेच चांगले परिणाम दिसले तरीही त्याच्यामुळे मातीचा कस कमी होतो याऊलट नैसर्गिक खतामुळे जमिनीचा कस वाढतो .
दुसरा थर दोन ते तीन इंचाचा मातीचा आणि पालापाचोळा शेणखत हा द्यावा.
- कडूलिंबाच्या पाल्यापासून बनवलेले खत हे उपयुक्त ठरतं.
- झाडांना महिन्यातून एकदा खत घालावे.
- काही झाडे वर्षभर टिकणारी असतात जेव्हा आपण झाड विकत घेतो.
- तेव्हा त्या झाडाबद्दलची संपूर्ण माहिती नर्सरीतून झाड विकत घेताना घेतली पाहिजे.
- त्याप्रमाणे झाडाची निगा राखली तर त्यांना जोपासना झाडांना निरोगीपणे वाढवणे सोपे जाईल.easy-tips-to-maintain-your-garden .
कीड लागल्यास घरच्या घरी करता येतील असे उपाय
१. बेकींग सोडा
घरात बेकिंग पावडर असतेच. झाडांची ही बुरशी घालवण्यासाठी एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा हॉर्टिकल्चर ऑइल ( नर्सरीमधे मिळते) २ लिटर पाण्यात घालावं. ते चांगलं घोळून घेतल्यावर झाडाला जिथे बुरशी असेल तिथे स्प्रेने हे मिश्रण झाडांवर फवारावं. बुरशी घालवण्याचा हा उत्तम उपाय आहे. घरच्याघरी हॉर्टिकल्चर ऑइल तयार करता येतं. बुरशी जाईपर्यंत तयार केलेले हे मिश्रण रोज जास्वंदाच्या झाडावर फवारावं.
२. कडूलिंब
कडूलिंबामधे कीडविरोधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग झाडांवरील कीड घालवण्यासाठीही करता येतो.
यासाठी कडूलिंबाची भरपूर पानं घ्यावीत.
ती मोठ्या भांड्यात पाण्यात भिजवून ठेवावीत.
सकाळी हेच पाणी चांगलं उकळून घ्यावं. थंड करुन हे पाणी स्प्रे बॉटलमधे भरुन झाडांवर फवारावं. कीड असेपर्यंत हे करत राहावे, त्याचा कीड जाण्यास फायदा होतो.
झाडांवर कीड नसली तरी झाडांचं कीडीपासून संरक्षण होण्यासाठी आठवड्यातून एकदा कडूलिंबाचा काढा फवारावा.
३. हळद
हळद देखील अॅंटिबॅक्टेरिअल आहे. त्यामुळे फुलझाडांवरील कीड मारण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता.
बऱ्याचदा मातीत कीड असेल तर ती झाडांवर लागून फुलं खराब होतात. यासाठी कीड मुळापासून नष्ट करायला हवी.
जर तुम्ही एक किलो माती झाडात वापरली असेल तर एक चिमूट भर हळद मातीत मिसळा आणि त्यात पुरेसे पाणी टाका.
त्यामुळे हळद मातीत मिसळेल आणि कीड नष्ट होईल.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. असे नवीन अपडेट्स ऐकण्यास वाचण्यासाठी बातम्याआणि माहिती या पेजला लाईक करा.
easy-tips-to-maintain-your-garden