Monday, December 23, 2024
InformationNewsPune

हवामानाचा अंदाज समजणार आता शहरात ३५ ठिकाणी

climate-forecast-in-pune

पुणे – पुणे हवामान विभाग आणि महानगर पालिका यांच्यावतीने पुणेकरांना लवकरच शहरातील तापमान लाईव्ह समजणार आहे. .महानगरपालिकेच्या वतीने काही ठराविक ठिकाणी काही फलक उभारले आहेत परंतु त्याची ऑनलाईन माहिती समजते.
आता मात्र नागरिकांना शहरातील ३५ ठिकाणांहून किमान व कमाल तापमान आणि पाऊस पडल्यानंतर किती पाऊस झाला त्याची माहिती  समजणार आहे .

climate-forecast-in-pune
यासंदर्भात येत्या आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर कृष्णानंद होलसीकर यांनी दिली .

climate-forecast-in-pune
याबद्दल डॉक्टर होलसीकर म्हणाले कि, उन्हाचा पारा किती आहे किंवा पावसाळ्यात किती पाऊस झाला याची माहिती नागरिकांना लगेच समजत नाही त्याविषयी मी विचार करून शहरात लाइव्ह डेटा देता येऊ शकतो ज्याचा नागरिकांना फायदा होईल अशी माहिती देणारे पत्र महापालिकेला पाठवले होते त्यांच्याकडून तसा प्रतिसाद आला आहे.climate-forecast-in-pune

पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत शहरात कोणत्या ठिकाणी फलक लावायचे ते ठरवण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले .

climate-forecast-in-pune

error: Content is protected !!