Monday, October 7, 2024
Informationलेख

चाहूल सुखाची

दररोज आम्ही मैत्रिणी संध्याकाळी एका पार्कमध्ये भेटतो. छान ग्रुप तयार झाला आहे आमचा. विविध विषयांवरील गप्पा, विचारांची देवाणघेवाण त्यामुळे मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होते. आजही आमच्या रोजच्या प्रमाणे गप्पा सुरू होत्या, पण मनीषा (नाव बदललेले आहे) आज जरा शांत शांत वाटली आम्ही विचारले तशी ती बोलायला लागली, अग.. उद्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आणि घरी पूजा ठरवली आहे. काय करावे समजत नाही मागच्या वेळी पण असेच झाले होते. ऐन वेळेला ऑफिसने सुट्टी नाकारली त्यामुळे मी पूजेला हजर नाही राहू शकले मग नंतर मनाला उगाचच चुटकुट लागून राहीली. तिचं बोलणं ऐकलं आणि सोबतच्या इतर जणींनीसुद्धा त्यांचे अनुभव सांगायला सुरुवात केली. एकूणच विषय वेगळे असले तरी मुद्दा मात्र सर्वजणींचा एकच होता. प्रत्येकीच्या मनातून एक भीती डोकावत होती. chahul-sukhachi

त्यावेळी माझ्या मनात विचार आला तो म्हणजे, ज्या देवी देवतांना आपण छान प्रशस्त अशा गाभार्यात बसवतो. त्यांना सुगंधी फुले अर्पण करतो.पंच पकवानांचा नैवेद्य दाखवतो ,आणि त्यांना ओवाळलेल्या उदबत्तीच्या वासाने संपूर्ण घरात सुगंध पसरतो. हे सर्व आपण नक्की कशासाठी करतो, पूर्वपार चालत आलेल्या गोष्टी पुढे नेण्यासाठी नाही केलं तर काय होईल या भीतीपोटी की स्वतःच्या आनंदासाठी ?प्रश्न बराच वेळ डोक्यात घोळत होता. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड आपल्याला जमत नाही का? आपण कधी तो प्रयत्न करत नाही. परमेश्वर सगळीकडे आहे. चराचरात आहे, मना मनात आहे तरीसुद्धा आपण जे करतो ते आपल्याला कितपत शांतता प्रदान करते, या गोष्टीचा जर विचार केला तर असे जाणवते की ,आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक काही नियम बनवले आणि ते बनवताना त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा विचार केल्याचे अनेक वेळा सिद्ध होते . जसे की, चतुर्मासात कांदा लसूण वर्ज करावा यामागे चातुर्मास हा पवित्र महिना आणि या महिन्यात कांदा लसुण खाऊ नये नाहीतर देवाचा कोप होईल अशी भावना लोकांच्या मनावर बिंबवली गेली पण यामागे, पावसाळ्यात कांदा आपल्या शरीराला मानवणार नाही हे वैज्ञानिक कारण आहे .

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या पूर्वजांनी देवाची भिती दाखवून आपल्या अंगवळणी पाडल्या, त्यामुळे सर्वांचा फायदाच झाला पण मनात भीती मात्र कायम घर करून बसली. मला नित्य देवपूजा हा माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवायचा आहे. मनशांतीसाठी ती अत्यंत आवश्यक आहे हे मला पटले असले तरी जोपर्यंत देवाबद्दल मनात असलेली भीती कमी होणार नाही तोपर्यंत आपण परमेश्वराच्या खऱ्या अर्थाने जवळ जाऊ शकणार नाही. परमेश्वराला घाबरण्यापेक्षा त्यांच्या जवळ जाणे हे खऱ्या अर्थाने भक्तिमार्गाला लागणे होय.chahul-sukhachi

chahul-sukhachi

काल आज आणि उद्या सुद्धा परमेश्वर वेगवेगळ्या रूपात भक्तांच्या सोबत होते, आहेत आणि राहतील यात तिळमात्र शंका नाही, पण गरज आहे ती आपले विचार बदलण्याची. हे विचार बदलण्यासाठी, आपल्याला भक्ती मार्गाला लावण्यासाठी, मनशांती लाभावी यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक अध्यात्मिक गुरु आहेत त्यापैकी एक म्हणजे श्री श्री रविशंकर जी. अध्यात्मिक आणि मानवतावादी नेते म्हणून जगभरात त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी संपूर्ण जगभर अभूतपूर्व अशी चळवळ सुरू केली आहे. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूस यासारख्या विविध संस्थांची त्यांनी निर्मिती केली.द्वेष आणि दुःख यावर प्रेम आणि ज्ञान यांनी विजयी विजय मिळवता येऊ शकतो हा साधाच पण शक्तिशाली संदेश घेऊन श्री श्री रविशंकर जी दरवर्षी जवळपास 40 देशांमध्ये प्रवेश करतात आणि प्रत्येक व्यक्तीला जगण्याची नवी दिशा देतात. या विचारांची आज आपल्या समाजाला नितांत गरज आहे जेणेकरून आपल्या मनातली परमेश्वराची भीती कमी होण्यास मदतही होईल आणि मानसिक शांती प्राप्त होईल.chahul-sukhachi

Shweta Kulkarni

Journalist | Writer | Anchor | Blogger

WhatsApp
error: Content is protected !!