बंगळुरू मधील रामेश्वरम कॅफे बद्दल ऐकलंय का ? महिन्याला कमावतात ४. ५ करोड रुपयांचा गल्ला
bengaluru-rameshwaram-cafe खाण्यासाठी जन्म आपला
हे वाक्य बऱ्याच वेळा कानावर पडते आणि प्रत्येक वेळी नव्याने आपण त्याच्या प्रेमात पडतो. पदार्थ मग तो कुठलाही असो महाराष्ट्रीयन असो वा साउथ इंडियन प्रत्येकाची चव, करण्याची पद्धत वेगळी, पूर्वी असे अनेक पदार्थ घरी करून बघितले जायचे पण आता घराबाहेर सुद्धा अनेक असे पर्याय उपलब्ध झाले आहे. त्यात आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू,कर्नाटक ही राज्य कुरकुरीत डोसा, गरम उत्तप्पा, वाफाळती इडली, फिल्टर कॉफी यासाठी खास करून ओळखली जातात.
पण प्रत्येक राज्यातील शहरातील हे पदार्थ बनवण्याची पद्धत थोडीफार बदलते. कर्नाटकामधील बेंगलोर शहरातील रामेश्वरम कॅफे हे ठिकाण खवय्यांसाठी खास म्हणुन ओळखले जाते. समृद्ध संस्कृतीत वारसा आणि पारंपारिक खाद्यपदार्थ साठी ओळखले जाणाऱ्या तामिळनाडूमधील रामेश्वर या शहरापासून प्रेरित होऊन रामेश्वरम कॅफे ची निर्मिती झाली.या कॅफेमधील मेनू हा तामिळनाडूतील अस्सल स्वादिष्ट पदार्थ आणि आधुनिक पाककला यांचा संगम आहे जेवणाचा अविस्मरणीय अनुभव शोधणाऱ्या खाद्यप्रेमींसाठी रामेश्वर कॅफे हे एक प्रिय ठिकाण बनले आहे वरचेवर त्याची लोकप्रियता वाढत आहे ती केवळ पाककृतीमध्ये मुळेच नाही तर त्यांच्या आदरातील आणि निर्दोष सेवेमुळे सुद्धा .
एक शुद्ध शाकाहारी रेस्टोरंट ची स्थापना श्री राघवेंद्र राव आणि श्रीमती दिव्या राघवेंद्र राव यांनी केली रामेश्वरम हे नाव डॉक्टर ए पि जे अब्दुल कलाम याना श्रद्धांजली म्हणून निश्चित केले होते .रामेश्वर हे कलाम यांचे जन्मस्थान होते या रेस्टॉरंटमधे दरमहा ७५००बिले कापली जातात. एक १० बाय १० च्या जागेला हा व्यवसाय आहे .या कॅफेमधुन ग्राहकांना सर्वोत्कृष्ट ताजे आणि गरम अन्न तयार करुन दिले जाते स्वच्छतेच्या बाबतीत ऊत्कृष्ट मानांकन प्राप्त असलेल्या या कॅफेमधे पदार्थांची चव घ्यायलाच हवी .
जर तुम्ही बेंगळुरूला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या भेटीच्या यादीत रामेश्वरम कॅफे जाण्याचे सुनिश्चित करा.
त्यांचे दिवसाला 7,500 बिले आणि त्यातून महिन्याला 4.5 कोटी रुपयांचा व्यवसाय करतो आणि वर्षाला सुमारे 50 कोटी रुपयांचा व्यवसाय करतात