मौखिक कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे
National-Cancer-Prevention-Policy
सोलापूर :- तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे त्यामुळे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे .सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचा वापर आणि विक्रीला प्रतिबंध करावा तसेच या सेवनाच्या दुष्परिणाम बाबत व्यापक जनजागृती करावी अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वयक समितीच्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कोटपा कायदा 2003 याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे सांगून जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे सेवन करणे यावर प्रतिबंध करावा.National-Cancer-Prevention-Policy
असे पदार्थ सेवन करताना कोणी आढळल्यास कोटपा कायदा 2003 National-Cancer-Prevention-Policy नुसार कारवाई करावी असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
या बैठकीस अन्न औषध विभागाचे अधिकारी पोलीस विभागाचे अधिकारी शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते .तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी ,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाचे अमित महाडिक, श्रीमती मंजुश्री मुळे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभाग समन्वयक रंगनाथ जोशी, राज्य अधिकारी जीआर शेख, सारथी फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे आदिसह समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.National-Cancer-Prevention-Policy