श्रावणी आणि सत्याचं लग्न… २० जानेवारीपासून आता चित्रपट गृहात पाहायला मिळणार
अवघ्या तीन आठवड्यात वेड चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार करत एक नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे. ५० कोटींचा टप्पा पार करणारा वेड हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. याअगोदर सैराट चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार करत १०० कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला होता. त्याच्या पाठोपाठ आता वेड चित्रपट ved movie सुद्धा ही बाजी मारणार अशी आशा चित्रपटाच्या चाहत्यांनी केलेली आहे. वेड चित्रपट श्रावणी च्या एकतर्फी प्रेमाची गोष्ट होती. श्रावणी तिच्या प्रेमाने सत्याचे मन जिंकते मात्र चित्रपटात या लाडक्या जोडीवर एकही रोमँटिक गाणं पाहायला मिळालेलं नव्हतं. ज्या प्रेक्षकांनी वेड चित्रपट पाहिला त्यांना सुद्धा ही त्रुटी चित्रपटात जाणवली त्यामुळे रितेशने यावर विचार केला. ritiesh deshmukh,genelia deshmukh
नवीन काहितरी घेऊन येतोय अशा आशयाची एक पोस्ट रितेशने ritiesh सोशल मीडियावर शेअर केली होती. आता वेड चित्रपट रिलीज होऊन १८ दिवस झालेत चित्रपट हिट सुद्धा झालाय मग आता चित्रपटात आणखी काय येणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र आता या गोष्टीवरचा पडदा हटला आहे. येत्या २० जानेवरीपासून वेड चित्रपटात आणखी एक गाणं ऍड करण्यात आलं आहे. या गाण्यात रितेश आणि जेनेलिया सात फेरे घेताना दिसत आहेत. सत्या श्रावणीचा स्वीकार करतो मात्र त्यानंतर पुढे काय होतं? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना आता या गाण्यातून मिळालं आहे. श्रावणी आणि सत्या नववधू वरच्या वेशात सात फेरे घेताना दिसत आहेत. वेड चित्रपटाचे शीर्षक गीत एका नव्या रुपात या दोघांवर चित्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना श्रावणी आणि सत्याची प्रेमाची गोष्ट पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहे. २० जानेवारी पासून चित्रपट गृहात हे गाणं चित्रपटाच्या अखेरीस दाखवले जाणार आहे. या गाण्याची उत्सुकता प्रेक्षकांना सुद्धा आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांना सुद्धा ह्या गाण्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट ved movie पाहण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. म्हणूच आता हे सगळं नव्याने पाहायला मिळणार आहे. ved marathi movie.
चित्रपट रिलीज केल्यानंतर त्यात पुन्हा असे बदल करणे हे खूप कमी वेळा घडले आहे. त्यामुळे हा बदल प्रेक्षक स्वीकारतील अशी आशा व्यक्त केली जाते. खरं तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी रितेश आणि जेनेलियाच्या जोडीला पसंती दर्शवली आहे. या दोघांनी मराठी चित्रपट सृष्टीला दमदार नायक नायिका मिळवून दिले आहेत. त्यामुळे या लाडक्या जोडीसाठी प्रेक्षकवर्ग पुन्हा थिएटरमध्ये गर्दी करतील यात शंका नाही. वेड चित्रपट पाहण्यासाठी आजही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज हा चित्रपट मराठीतील २ ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा आणि कोरोना काळानंतरचा प्रथम क्रमांकाचा कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पण रितेश देशमुखच्या या घोषणेनंतर हा चित्रपट सैराट चित्रपटाच्या कमाईच्या आकड्याला देखील मागे टाकताना पाहायला मिळणार आहे. अजूनही चित्रपट गृहांमध्ये वेड चित्रपटाची क्रेझ कायम असल्याने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई हा चित्रपट करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.