Saturday, December 21, 2024
InformationNewsTechnology

Mumbai Megapolis Metaverse : मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या सहकार्यातून साकार होणार स्वप्नातील मुंबई

Mumbai Megapolis Metaverse :

महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विभाग आणि टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) यांनी मुंबई मेगापोलिस मेटाव्हर्स (Mumbai Megapolis Metaverse), एक ‘डिजिटल ट्विन’ प्रकल्प सुरू केला आहे.

मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे.

मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या सहकार्यातून स्वप्नातील मुंबई साकार करणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नुकताच बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पर्यटन विभाग, सिडको, मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या माध्यमातून आयोजित मुंबई टेक विक कार्यक्रम पार पडला.

Mumbai Megapolis Metaverse

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण ३डी मध्ये मुंबई ची सफर करू शकता :

https://www.mumbaimetaverse.com/explore

 

अश्या आणि ह्या प्रकारच्या अनेक बातम्या आणि माहिती वाचण्यासाठी आत्ताच आम्हाला फॉलो करा

 

https://www.facebook.com/batmyaanimahiti

 

error: Content is protected !!