अवघा रंग एक झाला
वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी.ashadhi-ekadashi-2023 वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे .
या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते.
या दिवशी देव निद्रीस्थ होतात, अशी समजूत आहे.
यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणी लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत त्यांच्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात.
त्यालाच आषाढी वारी असं म्हटलं जातं. आषाढीला या दिवशी पंढरपूर मध्ये शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची, देहूतून तुकाराम महाराजांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहुन एकनाथांची तर मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची पालखी येते.
एकादशीला एक धार्मिक महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर निद्रिस्त होतात.
या एकादशीनंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात .ashadhi-ekadashi-2023
चातुर्मास म्हणून ओळखला जातो
हा चार महिन्यांचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. अशा ह्या आषाढी एकादशीला विठ्ठलभक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरपुरी पोहोचतात तेव्हा तिथे वैष्णवांचा मेळा भरतो आणि पंढरपुरात दूरवरून दाखल झालेल्या भक्तांची मांदियाळी चंद्रभागेच्या काठ आणि जय जय राम कृष्ण हरी चा जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जातं.
आषाढी एकादशीच्या कित्येक दिवस आधीपासूनच वारकऱ्यांना वेध लागतात ते वारीचे विठुरायाच्या दर्शनाचे
आणि त्यांचा परस्परांशी संवाद सुरू होतो चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी घराघरातून हे संवाद कानी येतात
आणि तयारी सुरू होते ती तहानभूक विसरून विठ्ठलाचा गजर करत वारी सोबत पंढरपुरी पोहोचण्याची आणि तो दिवस उजाडतो वारकरी त्याच्या दैवताकडे ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता पाई चालत दिंडी बरोबर निघतो.
एका अनामिक ओढीने भक्त चालत असतात आणि चालता चालता त्यांच्या श्रद्धास्थानी पोहोचतात स्वच्छ आणि सुंदर अशा चंद्रभागेला पाहूनच ते प्रफुल्लित होतात.
चंद्रभागेच्या काठावर
चंद्रभागेच्या काठावर स्नानाने शुद्ध होऊन दर्शनाच्या रांगेत लागतात दोन्ही कर कटेवर ठेवून 28 युगापासून विटेवर उभ्या राहिलेल्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने भक्त तल्लीन होऊन जातात आणि त्या रूपाकडे भान हरपून पहात राहतात.
तेव्हा विटेवर उभे राहिलेले ते सुंदर ध्यान पाहताना देहभान हरपून जाते तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने या ओळींवरूनच विठू माऊली ची महती समजते तिचं दर्शन होतं विठ्ठलाचे हे सजलेले रूप पाहताना भक्त भक्तीमध्ये लीन होतो.ashadhi-ekadashi-2023
आणि ताल वाद्यांमध्ये अवघी पंढरी दुमदुमते
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा
हेच वाक्य सर्व विठ्ठल भक्तांच्या मुखातून निघतात अशी ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा जिल्हा महाराष्ट्र धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.
वारीमध्ये लहान मोठा उच्च नीच जातीभेद नाही ज्या ठिकाणी गरीब श्रीमंत असा भेद नाही.ashadhi-ekadashi-2023
अशा या वारीमध्ये सर्व समुदायाचे लोक भक्ती भावाने एकत्र येतात आणि प्रत्येकाच्या मनात एकच आस लागलेली असते ती म्हणजे त्यांच्या दैवताला भेटण्याची त्यांच्या लाडक्या विठूरायाला भेटण्याची अशी ही वारी पाहताना अनुभवताना
अवघा रंग एक झाला
या शब्दाचा खरोखरी प्रत्यय येतो.
Follow Us on Facebook
Read All on www.batmyanimahiti.com