गणेश चतुर्थी मुहूर्त 2022 पूजा विधी,पूजेला लागणारे साहित्य
गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi Muhurt) मुहूर्त 2022 पूजा विधी, पूजेला लागणारे साहित्य.
गणेश स्थापना मुहूर्त कधी आहे 2022?
31 ऑगस्ट 2022 वेळ : 11:00 am ते 13:33 pm पर्यन्त
१) श्रीगणेशाची मूर्ति गणेश चतुर्थीच्या ८-१० दिवस आधी देखील आणून घरी ठेवता येते. ती आदल्या दिवशीच घरी आणावी असे नाही, तसेच मूर्ति बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याची आवश्यकता नसते.
२) भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करणेसाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नाही. प्रातः काल पासून मध्यान्हापर्यंत (अंदाजे दु. १:३० पर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना व पूजन करता येते.
३) उजव्या सोडेंचा गणपति कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोडेंचा सौम्य अशी समजूत करुन घेणे चुकीचे आहे.
४) भाद्रपद शु. 4 चे दिवशी श्री गणेश स्थापना / पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करु नये. एखाद्या वर्षी लोप झालेला चालेल.
५) गणपति स्थापना झाल्यावर सूतक आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपति विसर्जन करुन घ्यावे. एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झालेले चालतील.
६) घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशा वेळेस मूर्ति विसर्जन न करण्याची रुढी गैरसमजुतीमुळे आहे.
७) श्री गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवारी (कोणत्याही वारी) तसेच कोणतेही नक्षत्र असताना करावे.
गणेश स्थापना पूजा विधी साहित्य मराठी
हळद
कुंकू
गंध
शेंदूर
अक्षता
अत्तर
कापुर
धूप
उदबत्ती
कापसाचे वस्त्रमाळ
जानवे 2
जास्वंदीचे फूल
गूळ खोबरे
काडेपेटी
सुपारी 15
सुट्टे पैसे ( 1,2,5 या पैकी कोणतेही नाणी चालतील )
विड्याची पाने
रंगोळी
पाच फळे वेगवेगळे
नैवेध्यासाठी मोदक किंवा मिठाई
पंचामृत ( मध, दूध, साखर, तूप, दही एकत्र)
समई 2
कापूर आरती
निरांजन 2
अगरबत्ती स्टँड
पंचपात्र
पळी
कलश
शंख व घंटी
दूर्वा
नारळ
गणेश चतुर्थी पूजा विधी मराठी / Ganesh Chaturthi 2022
सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण गणेश मूर्ती ठेवणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या ठिकाणी चौरंग, टेबल, पाट या पैकी एक ठेवावे. त्यांतर चौरंगा भोवती रंगोळी काढावी त्यावर वस्त्र घालावे आणि वस्त्रावर तांदळाचे स्वस्तिक काढावे. तांदळाचे स्वस्तिक वर गणेश मूर्ती ठेवावी आपण मूर्ती उत्तर पूजा केल्याशिवाय हलवू शकत नाही त्यामुळे ठेवताना नीट लक्ष पूर्वक ठेवावी.
त्यानंतर एक कलश घ्यावा त्यावर स्वस्तिक काढावे त्यामध्ये पानी भरून घ्यावे आणि त्यामध्ये एक नाणे, दूर्वा, फूल, मंजुळा, हळदी, कुंकू आणि सुपारी टाकावे त्यावर 5 विड्याची पाने ठेवून नारळ ठेवावा आणि मूर्तीच्या समोर आपल्या डाव्या हाताला कलश ठेवावा. चौरंगावरती जागा असल्यास आपल्या डाव्या हाताला शंख आणि उजव्या हाताला घंटी ठेवावी. गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजुला समई लावून ठेवाव्यात.
त्यानंतर विडे बनवताना विड्याची 2 पाने घेऊन देट देवाकडे येईल अशाप्रकारे पाने ठेवून त्यावर सुट्ट नाणे आणि 1 सुपारी ठेवावी असे पाच विडे करून घ्यावी असे करून देवासमोर पाच विडे मांडावीत. आपल्या उजव्या बाजूला पाच प्रकारची फळे ठेवावीत त्याच्या बाजुला गूळ खोबरे ठेवावे.
वरील सर्व केल्यानंतर गणेश मूर्तीवरील वस्त्र काढावे आणि गणेशाची पूजा करताना मूर्तीचे आवाहन
पूजन, अभिषेक, फूल, दूर्वा अर्पण करून जानवे घालावे आणि गणेशाची आरती करावी