Sunday, December 22, 2024
Informationलेख

पुस्तक एक जग दाखवणारा मित्र..

World-book-day

ज्यांच्या  सोबतीने प्रत्येकाच्या आयुष्याचं फक्त सोनच होऊ शकत ती म्हणजे पुस्तके, विलियम शेक्सपियर, इंका गार्सिलोसॉ या ख्यातनाम व्यक्तींचा आजच्या दिवशी मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिलला  जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. मराठीतलं पुस्तक इंग्रजी मध्ये बुक म्हणून ओळखले जाते.

World-book-day

 

Bio Optical Organized knowledge  म्हणजेच Book हि एक अशी प्रणाली आहे कि जी जी माहिती संग्रहित करत असते .खरंतर हा शिक्षणाचा समानार्थी शब्दच म्हणायला हवा, कारण वाचाल तर वाचाल हे वाक्य लहान असल्यापासून कानावर पडत आहे  जसजसे वय आणि अनुभव वाढत जातोय तसतसे ह्या वाक्याचे महत्व अधिक पटत आहे .World-book-day

World-book-day

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुस्तके आपली सोबत करतात,चांगल्या वाईटाची जाणीव करून देतात. इतिहास, कला, विज्ञान, धर्म, निसर्ग, तंत्रज्ञान यापैकी कुठल्याही गोष्टीची माहिती पुस्तकामधूनच आपल्याला समजते. पुस्तके मनोरंजन तर करतातच पण आपल्या ज्ञानात भर घालतात .

 

कल्पनाशक्तीला चालना देतात आणि जगाकडे एका तठस्थ भूमिकेतून कसे बघायचे हे शिकवतात. या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला माहीत असतात पण काही जणांकडून नियमितपणे पुस्तक वाचनाचा श्री गणेशा केला जातो तर काही जणांकडून नाही, त्यामुळे आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रत्येक व्यक्तीने पुस्तक वाचनाचा संकल्प दृढ करायला हवा.World-book-dayWorld-book-day

 

सध्याच्या परिस्थितीत लहान मुलांना जे नवीन शाळेत जात आहेत त्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे मुलांची पुस्तके सर्वात सोप्या पद्धतीने जग दाखवतात,

एकूणच पुस्तके आपल्याला खूप काही शिकवतात.

जागतिक पुस्तक दिनाच्या खूप शुभेच्छा

वाचाल तर वाचाल.

Shweta Kulkarni

Journalist | Writer | Anchor | Blogger

error: Content is protected !!