Wednesday, December 18, 2024
InformationTechnologyमहाराष्ट्र

मुंबई मध्ये सुरु झालय भारतातील पाहिलं apple store जाणून घ्या संपूर्ण माहिती

apple-store-in-mumbai

MUMBAI –
जगातील एक नंबर ची मोबाइलल कपंनी असलेल्या ॲपलचे भारतातील पहिले स्टोर मुंबईतील BKC येथे सुरु झाले आहे. न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूर सारख्या शहरानंतर आता भारतात सुद्धा apple store सुरु झाले आहे . जगभरातील Apple Store हे त्यांच्या डिझाइनसाठी ओळखले जातात आणि तेच समोर ठेवून हे स्टोरही बनवण्यात आलं आहे. काल सीईओ टीम कूक यांच्या उपस्थितीत स्टोरचं उद्घाटन झालं. अॅपल भारतात 25 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे आणि या आठवड्यात कंपनी देशातील पहिले अॅपल स्टोअर उघडून मोठ्या विस्तारासाठी तयारी करत आहे,” असं कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे. स्थानिक प्रभावानुसार दोन्ही स्टोअरची रचना करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक म्हणाले की, “भारतात एक सुंदर संस्कृती आणि अविश्वसनीय ऊर्जा आहे. आमच्या ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी, स्थानिक समुदायांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि मानवतेची सेवा करणाऱ्या नवकल्पनांसह एक चांगले भविष्य घडवण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.

apple-store-mumbai

जाणून घेऊया भारतातील apple store बद्दल ह्या गोष्टी –
1. मुंबईतील apple स्टोर हे 20806 स्क्वेअर फूट एवढे भव्य आहे .

2. Apple BKC च्या स्टोअरमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि ते एकत्रितपणे 20 वेगवेगळ्या भाषा बोलतात.

3. जगातील इतर ॲपल स्टोर्समध्ये असणारे खास अशा विविध सुविधा याठिकाणी आहेत. त्यातीलच एक म्हणजे ॲपल ​ट्रेड इन प्रोग्राम. यातंर्गत याठिकाणी खरेदीदार त्यांचे जुने iPhone, Mac, iPad नवीन डिव्हाईस घेण्यासाठी एक्सचेंज करू शकतात. हाच ट्रेड इन प्रोग्राम Apple BKC येथे देखील उपलब्ध आहे.

apple-store-mumbai
4.Apple उत्पादनं आणि सेवांबद्दल ग्राहकांसाठी विशेष सत्रं
Apple BKC येथे दररोज, कंपनी आयोजित करणार आहे. याला “Today at Apple” सत्र असं म्हटलं जाणार असून याचं आयोजन दररोज केलं जाणार आहे

5.या स्टोरमधील एक खास गोष्ट म्हणजे याठिकाणी जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. तसंच या ठिकाणी विविध प्रक्रियांसाठी जीवाश्म इंधनाचा वापर कमी होणार असून स्टोअर कार्बन न्यूट्रल असून 100 टक्के अक्षय ऊर्जेवर चालणार आहे.

6.मुंबईतील अंबानींच्या जिओ सेंटर मधील  apple store भाडे 42 लाख रुपये प्रति महिना आहे apple-store-in-mumbai

error: Content is protected !!