Friday, December 20, 2024
CareerPuneमहाराष्ट्र

21 एप्रिल रोजी विभागीय महा रोजगार मेळाव्याचे आयोजन

pune-rojgar-melava

पुणे  : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि बानाई संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 21 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन वर्ष 2023 च्या अनुषंगाने, 21 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता औद्योगिक प्रशिक्षण केंद्र संस्था मोरवाडी पिंपरी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .

pune-rojgar-melava
इच्छुक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले पसंती क्रम नोंदविणे आवश्यक आहे. मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे , आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधार कार्डच्या  छायांकित प्रति सोबत आणाव्यात.


या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे. या मेळाव्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील खाजगी उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्याकडून सुमारे 2000 पेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.


या पदांकरिता किमान दहावी बारावी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पदव्युत्तर पदवी आयटीआय पदवीका धारक, अभियांत्रिकी पदवी एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदि पात्रता धारक स्त्री पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

error: Content is protected !!