असा हा एकच श्री हनुमान… hanuman-janmostav
hanuman-janmostav
श्रीराम नवमी नंतर येणार चैत्र महिन्यातील एक मोठा उत्सव म्हणजे हनुमान जन्मोत्सव .हा दिवस महाबलशाली हनुमानाचा जन्मदिवस .समर्थ रामदास स्वामी म्हणतात, “सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे.”
श्री हनुमान जन्मोत्सवाची कथा
शक्ती आणि भक्ती या दोन्हींचा आदर्श म्हणून हनुमानाला ओळखले जाते. हिंदू पौराणिक कथा नुसार हनुमानाचा जन्म आई अंजना आणि वडील केसरी यांच्या पोटी झाला.
वाल्मिकींच्या रामायणानुसार, बालपणात एके दिवशी सकाळी हनुमानाला भूक लागली आणि त्याने उगवत्या लाल रंगाला रंगाचा सूर्य पाहिला. पिकलेले फळ समजून हनुमानाने तो खाण्यासाठी उडी मारली परंतु सूर्याला पकडतात त्याचे हात कापू लागले. त्यामुळे तो सूर्यापासून लांब झाला त्यानंतर महाबली हनुमानला तो एक खेळ वाटू लागला. तो सूर्याला पकडून सोडून देत असे. ते पाहता इंद्रा सहित सर्व देवांना काळजी वाटू लागली.
सूर्याला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले आणि तो बेशुद्ध झाला, अशी एक कथा हनुमानाबद्दल सांगितले जाते. पुढे श्रीरामांच्या वनवासात त्यांची आणि हनुमंताची भेट झाली.
रावणाने सीतेची अपहरण केले तेव्हा हनुमानाने सीतेचा शोध लावला. हनुमानाचे अनेक गुणधर्म आहेत.
हनुमान चिरंजीवी आहे hanuman-janmostav
हनुमान ब्रह्मचारी आहे
हनुमान बलवान आहे
त्यामुळेच त्याला वीर महावीर या नावाने संबोधले जाते.
हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक आहे म्हणजेच तो अजूनही जिवंत आहे अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेथे मारुती हजर असतो असे म्हणतात.
भारतात आठ हनुमानाच्या झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती आहेत
1) खुलताबाद येथील घृष्णेश्वराच्या जवळ असलेली भद्रा मारुती ची मूर्ती
2) अलाहबाद यमुनेच्या तीरावर म्हणजे संगम घाटावर असलेली मूर्ती
3) मध्य प्रदेशात जामसावली येथील मूर्ती
4) राजस्थानमध्ये अलवर
5) राजकोट
6) इटावा जिल्ह्यातील पिलवा गावात
7) चांदोली जिल्ह्यात
8) छिंदवाडा
हनुमान हा श्रीरामांचा निस्सीम भक्त. भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची भक्ती ही सर्वपरिचित आहे.
उत्तर भारतात हनुमानाची उपासना केली जाते. तुलसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे.
हनुमान ही एक शक्तिशाली व बुद्धिमान देवता. हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या संकटांपासून हनुमान मुक्ती देतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे. हनुमानाने केवळ रामायणातच नाही, तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केलेली असल्याचे महाभारतात दाखले आहेत.
नंतर कलियुगातही हनुमान संकटांपासून पृथ्वीचे तसेच मानवी जीवनाचे रक्षण करतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे.
हनुमान जन्मोत्सवाचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ज्या व्यक्तीच्या मागे संकटे किंवा साडेसाती आहे त्यांनी हनुमंताची आराधना करावी असे मानले जाते. काही लोकांच्या मते, एकदा रामाच्या दीर्घायुष्यासाठी हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदुर लावला होता. म्हणूनच त्याला आणि त्याच्या भक्तांना चोळा असे म्हणतात. hanuman-janmostav
हनुमान चालिसा म्हणणाऱ्याना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते. साडे साती असतांना दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे. हनुमंत चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची भाविकांमधे मान्यता आहे. हनुमानाला लावण्यात येणारा शेंदुर अत्यंत पवित्र मानला जात असून भाविक तो शेंदुर आपल्या मस्तकावर धारण करतात.