साडी आणि अनंत आठवणी..
ती” दुरुन जरी दिसली तरी खूप छान वाटते, मनावर मोरपीस फिरत असल्याचा भास होतो sadi-ani-aathvani
आणि डोक्यात विचारांच चक्र सुरू होतं आपल्या अंगावर ही ‘साडी ‘ कशी दिसेलदुकानाबाहेर स्टॅच्यूला लावलेल्या साडी कडे पाहून काही क्षण मन रेंगाळते. गेल्या काही वर्षांत साडीच्या बरोबर अनेक ड्रेस बाजारात आले सलवार सुट, लेहंगा-चोली,अगदी वेस्टर्न म्हणाल तर जिन्स स्कर्ट खुप काही पण साडीची नजाकत काही वेगळीच.साडी हा शब्द संस्कृत भाषेतील शाटी किंवा शाटिका या शब्दावरुन निर्माण झाला आहे.शाटिका म्हणजे चौकांनी आकाराचे लांब वस्त्र.
सहावारी असो व नऊवार तिची अनेक रूप कधी वेगळी रंगसंगती तर कधी सुंदरसा काठपदर..आपलं रूप खुलवणारी साडी स्वतः किती सुंदर असते. मागील काही वर्षांपासून साडीचे कितीतरी नवीन प्रकार बाजारात आले आहेत त्यात कॉटन,सिल्क, मिक्स कॉटन असे अनेक प्रकार आणि त्यावर सुंदर अशी प्रिंट, वर्क एकूणच मोठा राजेशाही मामला साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र समजले जाते.
साडीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात, तर काही त्या साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी चारवारी, पाचवारी , सहावारी, नऊवारी किंवा दहावारी असते. नाशिकच्या सप्तशृंगी देवीला ११ वार साडी लागते.sadi-ani-aathvani
अर्धरेशमी, ऑरगंडी, ऑरगेंझा साडी,, रुंद काठाची साडी, काठा पदराची साडी, कोयरीकाठी साडी, क्रेप प्रिंटिंगची साडी, गर्भरेशमी साडी,नायलॉनची साडी, पट्ट्यापट्ट्याची साडी, पाचवारी साडी, पावडा साडी (तामिळनाडू),प्लॅस्टिक जरीची प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी बांधणी (राजस्थानी-गुजराथी) वायल असे अनेक प्रकार आहेत साडी चे प्रत्येक प्रसंगाचा वेगळा प्रकार जो कुठलीही स्त्री अगदी आवडीने परिधान करते .
साड्यामध्ये पैठणी हि साडयाची महाराणी समजली जाते. महाराष्ट्रात तयार होणारी हि पैठणी मराठी स्त्री ची शान आहे . काहीशी महाग असणारी पैठणी पूर्वी हाताने विणली जायची, त्यावर रंगकाम, भरतकाम करणारे कलाकार होते. पैठणी बनवण्याची कला साधारण २००० वर्ष जुनी आहे. पैठणीचे मूळ गाव म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले मराठवाडयातले पैठण. प्राचीन काळात पैठण रेशीम व जरीच्या व्यापाराचे महत्त्वाचे ठिकाण होते. त्यावेळी रोमन देशाच्या राजाला कापसाचे सूत व रेशीम धागा निर्यात केला जायचा. १८व्या शतकात पेशव्यांचे राज्य होते. पेशव्यांनी पैठणींच्या उत्पादनाला प्रोत्साहन आणि चालना दिली. पैठणीचे रंग आणि नक्षी वैशिष्टपूर्ण असते. पैठणी मुख्यता दोन रंगात असते. एक साडीचा मूळ रंग व दुसरा कठावरचा रंग. पैठणी साडीवरची नक्षी देखील वैशिष्टपूर्ण आहे. अजिंठा लेण्यांच्या प्रभावामुळे पैठण कारागीरांवर बौध्द धर्माचा प्रभाव अधिक होता. हा प्रभाव त्यांच्या नक्षीकामातही जाणवतो जसे कमळाचे फूल, हंस, फूलांची वेलबुटटी, नारळी, मोर, राघू-मैना इत्यादीचा वापर अत्यंत आकर्षकपणे केला जातो.sadi-ani-aathvani
आज साडीचा वापर जरा कमीच झाला आहे असं बर्याच वेळा कानावर पडत असलं तरी सणासुदीला आवर्जून साडी नेसली जाते. जेव्हा साडी खरेदी साठी दुकानात आपण जातो तेव्हा दुकानदार आपल्याला आवडलेली साडी नेसून दाखवतात तेव्हा तर साड्यांची एकमेकींशी जणु स्पर्धा सुरू असते. आपल्याला नेसणारी तुला नेसून जास्त सुंदर दिसेल का मला नेसून असच तर त्या परस्परांना म्हणत नसाव्यात.
खरच समारंभ असो वा ऑफिसची पार्टी साडी नेसून मिरवणारी हमखास भाव खाऊन जाते. साडीचे प्रकार तसे प्रांतावरूनही पडलेत आज सगळ्या गोष्टी सगळीकडे मिळतात पण पैठण बनारस बनारस अशा गावांना गेल्यावर एक साडी खरेदी करताना भरपुर साड्या पहाण्याचा मोह काही आवरत नाही..sadi-ani-aathvani
श्वेताविनायक