Sunday, December 22, 2024
Travelling

राजस्थानातील पाच ठिकाणं जी पाहिल्याशिवाय ट्रिप पुर्ण होऊच शकत नाही..

राजस्थानातील पाच ठिकाणं जी पाहिल्याशिवाय ट्रिप पुर्ण होऊच शकत नाही.. Best places to visit in Rajasthan

ब्रम्हा टेंपल- पुष्कर-

rajasthan-bramha temple

 

ब्रम्हा विष्णू आणि महेश या तीन देवतांपैकी ब्रह्माजींनी सृष्टीची निर्मिती केली .
त्यांनी चार वेदांचे ज्ञान दिले भारतात भगवान विष्णू आणि महेश यांची अनेक मंदिर आहेत तर सृष्टीनिर्मात्या ब्रह्माजींचं एकच मंदिर आहे जे राजस्थानातील पुष्कर येथे स्थित आहे.
त्यामुळे पुष्कर हे पवित्र असे एक तीर्थक्षेत्र मानले जाते आज पासून एक हजार दोनशे वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम झाले असल्याचे दाखले आहेत आज पुष्कर येथील या मंदिराला जगतपिता ब्रह्मा मंदिर म्हणून ओळखले जाते दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला मंदिर परिसरात एक मोठी जत्रा असते संपूर्ण जगात ब्रह्मदेवाचे केवळ तीन मंदिर आहेत यापैकी एक भारतात भारतातील राजस्थान येथील पुष्कर गावात आहे चौदाव्या शतकात बनले आहे . Rajasthan

नाथद्वारा – 

राजस्थानातील नाथद्वारा या गावात जगातील सर्वात उंच आणि मोठी भगवान शंकराची एक मूर्ती बनवली आहे. जी मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे. नाथद्वारामध्ये असलेल्या शंकराच्या प्रतिमेचे वजन 3000 टन आहे, 26 एकर मध्ये असलेला हा संपूर्ण परिसर अत्यंत सुंदर आहे. यासाठी 2600 टन स्टील आणि लोखंड वापरलेले असून भगवान शंकराचा चेहरा 70 फूट उंच आहे.
अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असा हा परिसर आणि भव्य शिवमूर्ती असलेले हे ठिकाण एकदातरी नक्कीच पहावे.

 

 

जगदीश टेंपल ऊदयपुर – 

जगदीश मंदिर हे उदयपूरच्या मध्यभागी असलेले एक मोठे मंदिर आहे. त्याचे बांधकाम 1651 मध्ये संपले. हे उदयपूरमधील पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. हे मंदिर मारू-गुजराना वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यात विष्णूची मूर्ती बसवली आहे.

 

 

 

 

 

हल्दीघाटी –

महाराणा प्रताप आणि अकबराच्या सैन्यामध्ये १८ जून १५७६ रोजी झालेल्या हल्दीघाटीच्या लढाईसाठी हल्दीघाटीचा खिंड इतिहासात प्रसिद्ध आहे. हे राजस्थानमधील एकलिंगजीपासून १८ किमी अंतरावर आहे.

अरवली पर्वत रांगेतील खमनोर आणि बालिचा गावांमधला हा एक ऐतिहासिक अरुंद नैसर्गिक खिंड आहे. येथून सुरू झालेले युद्ध खमनोर येथील रक्ता तलाईच्या मोकळ्या मैदानात लढले गेले आणि ते रक्ताच्या तळ्यासारखे भरले गेले. हे राजसमंद आणि पाली जिल्ह्यांना जोडते. हे उदयपूरपासून ४४ किमी अंतरावर आहे. येथील माती हळदीसारखी पिवळी असल्यामुळे याला हळदीघाटी असे नाव पडले.

नक्की झिल-

येथे 12 फेब्रुवारी 1948 रोजी मरणोत्तर महात्मा गांधींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले आणि गांधी घाट बांधण्यात आला. असे म्हणतात की नक्की तलावाची निर्मिती देवांनी केली होती ज्यांनी राक्षसांपासून वाचण्यासाठी आपल्या नखांनी हे तलाव खोदले होते. त्यामुळे याला नक्की तलाव असे म्हणतात.
माऊंट अबूच्या सुंदर मैदानात रसिया बालम या प्रियकराने आपल्या प्रेमाखातर आपल्या नखांनी हा तलाव खोदला होता .अशीही एक कथा प्रचलित आहे.

 

 

 

 

 

 

error: Content is protected !!