Sunday, December 22, 2024
NewsPoliticsPune

चिंचवड येथील पोट निवडणुकीत अश्विनी जगताप ह्यांचा विजय.. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

अश्वीनी जगताप कोण आहेत
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला ज्यामध्ये भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या .
कोण आहेत अश्विनी जगताप..
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी
सातारा जिल्हय़ातील रहिवासी

सामाजिक कार्यात तसेच महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर
राजकारणात सक्रिय नसल्या तरी प्रचारात नेहमीच सोबत
प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा
ज्याच्यामाध्यमातुन त्यानी बचत गटाचं जाळं तयार केलं. या महिलेवर जनतेने विश्वास दाखवला आणि आमदार आमदार पदाची जबाबदारी त्यांच्या शिरावर आली.


यावेळी लक्ष्मण जगतापांच्या शक्ती स्थळावरून शक्ती घेऊन मी विधानसभेत जाणार आहे असे अश्विनीताई म्हणाल्या, गड आला.. पण सिंह गेला लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले त्यामुळे आम्हा सर्वांना गड राखायचा होता आणि तो आम्ही राखला अशी प्रतिक्रिया अश्विनीताई यांनी दिली.आणि हा विजय त्यांनी सर्व सामान्यांना समर्पित केला. दरवेळेस साहेबांना मतदान करायचे यावेळी स्वतःला मतदान करताना मनात एक हुरहुर होती.हे बोलताना त्या भाऊक झाल्या होत्या.हा विजय लक्ष्मण जगताप आणि सर्वसामान्यांचा असल्याचं त्या म्हणाल्या यापुढे माझे दार सर्वांसाठी उघडे असेल अधिवेशनाला जाईल, आणि सर्वसामान्यांची आमदार म्हणूनच काम करेल आणि सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल असेही त्या म्हणाल्या.

error: Content is protected !!