पंचम स्कूल ऑफ म्युझिक ची संगीत सभा संपन्न..
धृपदगंगा फाऊंडेशन पुणे संचलित पंचम स्कूल ऑफ म्युझिक Pancham School Of Music आणि संस्कार भारती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगीतांची विशेष मैफिल रविवारी सायंकाळी नटसम्राट निळु फुले सभागृह पिंपळे गुरव येथे पार पडली.
यावेळी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष विकास काशाळकर , पंडित सुधाकर चव्हाण,प्रख्यात बासरीवादक हिमांशू नंदा यांची विशेष उपस्थिती होती.
संस्कार भारती पिंपरी चिंचवडच्या विभाग सचिव लीना आढाव याही यावेळी उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी एकाहून एक दर्जेदार अशी नाट्यगीते सादर करत सर्व रसिक श्रोत्यांना सांकेतिक मेजवानी दिली.
यावेळी संस्कार भारती ध्येय गीत सादर केले गेले तर अनेक लोकप्रिय अशी नाट्यगीत सादर करून विद्यार्थ्यांनी नाट्यगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना तबल्यावर स्वप्निल दीक्षित, अमोल माळी ,आणि विष्णू गलांडे यांनी साथ दिली तर हार्मोनियम वर श्री गंगाधर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना साथ संगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा फुलकर यांनी केले तर रागिनी कौसडीकर यांनी आभार मानले.
Pancham School Of Music