Sunday, December 22, 2024
लेख

एक जादू : हास्यातून आनंदाकडे नेणारी…

मनमोकळे हास्य आणि आनंद हे सर्वात बेस्ट असे मोटिवेशन आहे.यामुळेच आपल्याला आनंद मिळत असतो मनावरचा ताण निवळतो आणि पुन्हा एकदा आपण स्वतःच्या प्रेमात पडतो. पण हे हास्य हा आनंद मिळवायचा कसा याचा कानमंत्र मात्र फार कमी जणांना माहिती आहे.smile-happiness

happiness

आपल्या ओठांवर कायम असणारी एक गोष्ट म्हणजे हास्य. इतर कितीही  गोष्टी करत असलो तरी सुद्धा आपण  ह्या दोन गोष्टी वापरताना फारच कंजूसी करत असतो. कारण आपल्या मनाला कायमच जवळ असलेल्या गोष्टींपेक्षा जे आपल्यापासून जरासे दूर आहे ते मिळवण्याचा ध्यास जास्त असतो .आणि जोपर्यंत ती वस्तू मिळत नाही तोवर प्रत्येक  व्यक्ती अस्थिर असते ,असंतुष्ट असते .परिणामी हास्य आणि आनंद दोन्ही गायब होतात.smile-happiness

 

 हे हास्य आणि आनंद टिकवण्याचे काही नियम आहेत  ते जर तुम्ही फॉलो केले तर आयुष्य खूप सुंदर होईल

1.त्यापैकी पहिला नियम म्हणजे दिवसभरात एकदा तरी अगदी कुठल्याही  छोट्या गोष्टीवरून मनसोक्त हसायचं

2. काम मग ते कुठलेही असो जितकं मन लावून चांगलं करता येतं तितकं करावं आपलं काम बिनचूक असावं दिसायला सुंदर असावं जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा आपल्या चेहऱ्यावर  आपोआप एक हास्य, समाधानाने भरलेले हास्य असते.

3. एकाच वेळी चार काम हातात घेणे आणि लवकरात लवकर ती पूर्ण कशी होतील याचा ध्यास जेव्हा आपण घेतलेला असतो, अशावेळी ती काम करताना चुका होतात आणि चिडचिड होते ती वेगळीच.  त्यापेक्षा चारही काम करावी पण एका नंतर एक आणि प्रत्येक कामानंतर स्वतःचं केलेलं कौतुक जे आपल्या कामाचा उत्साह वाढवतो. मग ते काम म्हणजे एखादी कलाकुसर असो घरामधला एक कॉर्नर आवरणे असो अथवा एका कपड्याला इस्त्री करणे. जेव्हा आपण कोणतेही काम अगदी नीटनेटकेपणे करतो त्यावेळी आपल्या आतून कुणीतरी त्या कामाची दखल घेत आहे असे आपल्याला प्रकर्षाने जाणवते आणि मन आनंद उत्साहाने भरून जाते.smile-happiness

happiness

4.आज प्रत्येक व्यक्तीला स्वतःला सिद्ध करताना रोज अनेक संकटाना सामोरे जावे लागते त्यावेळी खरी गरज असते प्रसन्न राहण्याची कारण हिच वेळ छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे शिकवते.

5.कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनाला जपणे आव्यश्यक आहे कारण मनाचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटते .
तुम्ही दुःखी असाल कष्टी असाल तर तुमचा चेहरा आनंदी दिसणार नाही अशा वेळेला गरज आहे ती आनंद मिळवण्यासाठी ध्यान करण्याची ही सध्याच्या युगातली गरज बनली आहे .smile-happiness

6.तुम्ही जे खाता खाता तसेच तुम्ही बनता आपल्या आहारात दररोज पौष्टिक घटकांचा समावेश करावा जेणेकरून मन प्रसन्न राहण्यास मदत होईल

हास्य आणि आनंद टिकविण्यास मदत होईलsmile-happiness

 

Shweta Kulkarni

Journalist | Writer | Anchor | Blogger

error: Content is protected !!