मर्यादापुरुषोत्तम राम
मराठी नववर्ष म्हणजेच गुडीपाडवा आणि ह्या दिवसापासून अनेक घरांमधून श्रीरामनवरात्र प्रारंभ होते . या नवरात्राचा नववा दिवस म्हणजेच, चैत्र शुद्ध नवमी, जो रामनवमी म्हणून साजरा केला जातो. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणून जन्म घेतलेले प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला.maryadapurshottam-ram

अयोध्येचे सूर्यवंशी महाराज दशरथ आणि त्यांची महाराणी कौशल्य यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजेच प्रभू श्रीराम .वाल्मिकींनी रचलेल्या रामायण या महाकाव्याचे नायक. आजही लहानांपासून थोरांपर्यंत रामायण माहीत नसलेली व्यक्ती विरळच, रामायणात प्रभू श्रीरामांचे संपूर्ण चरित्र कथन केले आहे. त्यामधून श्रीरामांचे सत्यवचनी, परमदयाळू आणि एक पत्नी व्रत दिसून येते .

रामायण हे महाकाव्य इतर अनेक भारतीय भाषांमध्ये रचले गेले आहे .पृथ्वीवर पाप वाढले,दुष्ट शक्ती लोकांना त्रास देऊ लागल्या की त्यांचा नाश करण्यासाठी श्रीविष्णू अवतार घेतात असे बोलले जाते आणि श्री विष्णूंचा सातवा अवतार म्हणजेच प्रभू श्रीराम.

लंकेचा राक्षस राजा रावण यांनी श्री शंकरांपासून कडून वर मिळवला आणि तो गर्विष्ठ होऊन सर्वांना त्रास देऊ लागला, रावणाला मारण्यासाठी भगवान विष्णू श्रीरामांच्या रूपात अवतरले अशी एक अख्यायिका आहे. याच श्रीरामांचा आदर्श आपल्या मुलांसमोर असावा म्हणून मुलांना रामायणातील कथा सांगितल्या जातात. रोज संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र त्यांच्याकडून म्हणून घेण्याची पद्धत आहे. श्रीरामाच्या या महिम्यामुळेच आपण सारे इतक्या उत्साहाने भक्ती भावाने श्रद्धेने श्री राम नवमी साजरी करतो. राम नाम मुखी असावे या एकमेव उद्देशाने जेव्हा एकमेकांशी कुठेही गाठ भेट झाली तरी अनेक जण अजूनही रामराम असे संबोधतात.maryadapurshottam-ram

आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या बाबतीत सुद्धा महात्मा गांधींनी राम राज्याचा आदर्श सर्वांच्या नजरेसमोर ठेवला .रामराज्यामध्ये कुठल्याही स्त्रीला दुःख नव्हते .प्रजेला व्याधीचे भय नव्हते, चोर किंवा चोरी हा प्रकार कुठेही नव्हता .एकूणच कुठल्याही प्रकारचा अनर्थ नव्हता या काळात हिंसा होत नव्हती, सर्वजण रोग, शोक यापासून मुक्त होते. maryadapurshottam-ram

लोककल्याण नजरेसमोर ठेवूनच रामराज्य सुरू होते कारण प्रभू रामचंद्रांनी स्वतः दुसऱ्याला दिलेले वचन पाळण्यासाठी अनेक हाल अपेक्षा सहन केल्या .प्रभू श्रीराम यांना त्यांच्या जीवनातील चरित्रामुळे मर्यादा पुरुषोत्तम हे नाव देण्यात आले .रामनवमी हा दिवस साजरा करण्यामागे प्रभू श्रीरामांचे जीवन परिपूर्ण अस्तित्व म्हणून भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे.
प्रभू श्रीरामांनी आपल्या वर्तनातून जो आदर्श संपूर्ण जगाला घालून दिला आहे त्याची आज नितांत गरज आहे.
त्यांचा अवतार त्या काली जरी दुष्टांचा संहार करण्यासाठी असला तरी आजच्या जगात त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करण्याची गरज आहे ज्यामुळे पुन्हा एकदा स्त्री सुरक्षित राहील आणि ह्या धर्तीवर रामराज्य अवतरेल . श्वेताविनायक
