गुडीपाडवा:नववर्षाची चैतन्यमय सुरवात Gudhi-Padwa-2023
गुडीपाडवा:नववर्षाची चैतन्यमय सुरवात* Gudhi-Padwa-2023
चैत्र प्रतिपदेला वसंत ऋतुचे आगमन होते त्यावेळी साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे . मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. त्याचे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात .ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची ची निर्मिती केली होती,असे बोलले जाते तर प्रभु श्रीराम आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी आयोध्येत परत आले होते.Gudhi-Padwa-2023
अनेक वर्षांपासून हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधुनिक युगात या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या ही विशेष महत्त्व प्राप्त आहे, त्यामुळे प्रत्येक पिढीसाठी गुढीपाडवा आणि त्याचे महत्त्व जाणून घेणे फार गरजेचे आहे.
खरंतर गुढीपाडवा भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे असणारा सण आहे. दक्षिण भारतातील लोक या सणाला उगादी म्हणतात. तर इतर वेगवेगळ्या ठिकाणी गुढी पाडवा संवत्सर पाडो, चेती, नवरेह अशा नावांनी ओळखला जातो.
प्रत्येक सण समारंभ साजरा करण्यामागे आपल्या पूर्वजांचे काही विशेष उद्देश्य असतात चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुच्या आगमनाला सुरुवात होते त्यामुळे वातावरणात बदल होत असतात. जुनी सुकलेली पान गळून झाडांना नवीन पालवी फुटते. आंब्याला मोहोर येतो आणि याचे प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते.तसेच ऊष्णतेपासुन बचावासाठी साखरगाठीचे सेवन केले जाते. पूर्वीपासूनच या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी या नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये अनेक गोष्टी केल्या जातात. त्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते. साडी नेसवुन तयार करुन गुढी उभी केली जाते .
या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी कडुलिंब घालून केलेल्या प्रसाद घेण्यामागे ही एक शास्त्र आहे. कडुलिंबाची कोवळी पाने फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध हे सर्व एकत्र मिसळून त्याचा प्रसाद तयार केला जातो तसेच कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजलेली डाळ जिरे ओवा, हिंग चिंच गूळ मीठ मिसळून चटणी केली जाते.
अश्या अनेक गोष्टी गेल्या किती तरी वर्षांपासून मराठी नववर्षाच्या सुरवातीला केल्या जातात.
वर्षभरात कितीही डे साजरे केले तरी विजयाच प्रतीक असलेली गुडी उभारुन मराठी नववर्ष साजरं करण्याची शान काही वेगळीच.. 😃 श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी अशा पारंपारिक जेवणाच्या मेनुवर मनसोक्तपणे ताव मारताना वाढणार्या कॅलरीज कडे थोडं दुर्लक्षच होतं
वर्षानुवर्षे साडी नेसण्याचा कंटाळा केला तरी आपसुकपणे ठेवणीतली पैठणी, नऊवारी नेसण्याची अगदी मनापासून झालेली इच्छा हीच खरतर आपल्यातलं मराठमोळेपण जपत असते.जगाच्या पाठीवर कुठेही जा आपली भाषा मराठी माणसाची कायम स्वतःची एक वेगळी ओळख असते.आणि ती ओळख व आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा.Gudhi-Padwa-2023