Sunday, December 22, 2024
लेखसंस्कृती

दीप अमावस्या

दीप अमावस्या deep-amavsya

दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥

पावसाचे नक्षत्र घेऊन येणारा आषाढ महिना हा हवाहवासा 😍वाटतोच कारण कांदेनवमी आखाड तळणे हे जिभेचे चोचले पुरवणारे 😋😋सणवार याच महिन्यात येतात.आणि याच महिन्यातील अमावस्येला दिपपुजन करून लक्ष्मीची आराधना केली जाते.

deep-amavsya

पूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा पण मागच्या काही वर्षांपासून मात्र हा दिवस गटारी म्हणुन ओळखला जातो आहे श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज करणारे आषाढ आमावस्येला मनसोक्त मांसाहार करतात.ही एक ओळख होऊ पहाते आहे .

दिप पुजन हे एक व्रत आहे, याच्या पाठीमागे एक अध्यात्मिक कथा आहे deep-amavsya

तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या एका श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावास्येसाठी सांगितली आहे. deep-amavsya

ही कथा आहे आजच्या दिवसाचे महत्व सांगणारी.

दिवा हा आपल्याला प्रकाश देतो. अंधार दुर करतो मन प्रसन्न करतो आणि प्रकाश नसेल तर आयुष्य किती कठीण होऊन जातं याची जाणीव आपल्याला बर्याच वेळा होऊन जाते.

असे हे दिप त्यांच्या ज्योतीने आयुष्य उजळुन टाकतात. deep-amavsya

वर्षातून एकदा दिवे स्वच्छ लखलखीत करून त्यांचे पुजन करणे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्यच आहे आणि त्यामुळेच आजच्या दिवशी ह्या दिव्यांचे पुजन केले जाते .

लहान असताना आजच्या दिवसाची मजा काही वेगळीच असायची आईला दिवे स्वच्छ करायला मदत केली तर नैवेद्यासाठी आवडीचा गोड पदार्थ तयार व्हायचा😋नंतर कळायला लागल्यापासून मग कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे हे मनात रुजलं त्यामुळे दरवर्षी हा दिवस मी मनापासुन साजरा करते.कारण प्रकाशाशिवाय आपण आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही.

सर्वांना दिप अमावस्येच्या शुभेच्छा

वरील लेख आणि सोबतची अध्यात्मिक कथा नक्की वाचा आणि आवडल्यास @batmyaanimahiti.com या पेजला नक्की फाॅलो करा..

तुम्हाला अशीच नवनवीन माहिती वाचायला मिळेल..

Shweta Kulkarni

Journalist | Writer | Anchor | Blogger

error: Content is protected !!